गुलाबसिंग रघुवंशी : KPD26B13626
-----------
शेतकरी संघटनेच्या विभागीय
अध्यक्षपदी गुलाबसिंग रघुवंशी
कापडणे, ता. ९ : सार्वे (ता. शिंदखेडा) येथील गुलाबसिंग रघुवंशी यांची शेतकरी संघटनेच्या विभागिय अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे उत्तर महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आहे. राज्य शेतकरी संघटनेच्या संलग्न इतर आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांचीही निवड घोषित झाली आहे.
त्यांच्या या निवडीने जिल्हाध्यक्ष देवरे, माजी अध्यक्ष शशिकांत भदाणे, आत्माराम पाटील, शांतीलाल पटेल, नारायण माळी, भगवान पाटील आदींनी समाधान व्यक्त केले. शेतकरी संघटना, शेतकरी महिला आघाडी, शेतकरी युवा आघाडी आणि स्वतंत्र भारत पक्षाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये शेतकरी संघटनेच्या अध्यक्षपदी मधुसूदन हरणे, महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सीमा नरोडे, युवा आघाडीच्या अध्यक्षपदी ॲड. दीपक चटप यांची निवड झाली. स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष म्हणून अनिल धनवट, प्रांताध्यक्ष म्हणून ललित बहाळे, महासचिव म्हणून गुणवंत पाटील यांची निवड करण्यात आली.
विभागीय पातळीवर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी संजय कोल्हे, मराठवाडा विभाग अध्यक्षपदी उत्तमराव वाबळे, विदर्भ विभाग अध्यक्षपदी सतीश देशमुख यांची निवड झाली. तंत्रज्ञान आघाडीच्या अध्यक्षपदी मिलिंद दामले, उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी विजय निवल, पश्चिम महाराष्ट्र उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी राजेश नाईक यांची निवड झाली.