नाशिक- गोवर्धन (ता. नाशिक) येथे पूर्ववैमनस्यातून गावातील संशयितांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष किशोर जाधव यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला. सुदैवाने त्यांनी प्रसंगावधान राखत संशयिताच्या हाताला धक्का दिल्याने हवेत गोळीबार झाल्याने ते थोडक्यात बचावले आहेत. नाशिक तालुका पोलिसांत संशयितांविरोधात जीवे ठार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिस शोध घेत आहेत.