नाशिक- राज्यभरात गुंठेवारीमुळे तुकडे झालेल्या जमिनी कायदेशीर करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे १ जानेवारी २०२५ पर्यंतच्या जमिनी कायदेशीर होताना एक गुंठ्याचा स्वतंत्र सातबारा निघेल. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार असून, शासनाच्या तिजोरीतही महसूल जमा होईल.