गुर्जर समाज अधिवेशन

गुर्जर समाज अधिवेशन
Published on: 
मेनफिचर NSK26H33546 जळगाव : गुर्जर समाजाच्या राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्सचे रविवारी उद्‌घाटन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. शेजारी व्ही. डी. पाटील, दिल्लीचे सेवानिवृत्त डीसीपी जी. एस. आवाना आदी. ----------- समाजाच्यादृष्टीने अधिवक्ता महत्त्वाचा घटक ------- पालकमंत्री गुलाबराव पाटील : जळगावात गुर्जर समाजाची राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्स सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २५ : राजकारणी मंडळी व वकील यांचा नेहमीच संबंध येत असतो. त्यामुळे राजकीय मंडळी व वकीलांनी एकत्र येऊन कामकाज करावे. राजकारणी, कायदे मंडळ, न्यायव्यवस्था व अधिवक्ते यांच्यातील परस्पर संबंध आहे. तर समाजाच्यादृष्टीने अधिवक्ता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे मत राज्‍याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्‍यक्‍त केले. देशभरातील गुर्जर समाजातील अधिवक्त्यांना एका मंचावर आणत व्यावसायिक उत्कृष्टता, सामाजिक सलोखा व राष्ट्रनिर्मितीचा संदेश देण्यासाठी जीए ५०० गुजर ॲडव्‍होकेटस्‌च्या वतीने आठवी राष्ट्रीय लॉयर्स कॉन्फरन्स २०२६ रविवारी (ता.२५) जळगावातील एका हॉटेलमध्ये झाली, त्यात उद् घाटक म्हणून पालकमंत्री पाटील बोलत होते. महाराष्ट्राचे माजी राज्य माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील, दिल्ली पोलिसांचे माजी डीसीपी जी. एस. आवाना, फारुख चौधरी (जम्मू-काश्मीर), राजवीर कसाना (दिल्‍ली) यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पाटील पुढे म्‍हणाले की, विधिमंडळात कायदे केले जातात. मात्र, त्या कायद्यांचा योग्य अर्थ लावून ते समाजाच्या उपयोगात आणण्याचे महत्त्वाचे कार्य न्यायव्यवस्था करते. न्यायव्यवस्थेला कायद्याच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्याची भूमिका अधिवक्त्यांची असते. आपल्या राजकीय व सार्वजनिक जीवनात अधिवक्त्यांनी दिलेल्या कायदेविषयक मार्गदर्शनामुळे अनेक अडचणींवर मात करता आली. शैक्षणिक प्रगतीवर भर परिषदेत ॲड. भगवान पाटील यांनी समाजाच्या शैक्षणिक प्रगतीवर विशेष भर दिला. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत व मार्गदर्शन मिळाले, तर एका विद्यार्थ्याने प्रगती केल्याने संपूर्ण कुटुंबाची व पुढे समाजाची प्रगती होते. त्यामुळे समाजाने मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. जी. एस. आवाना, भारत भूषण गुर्जर यांच्यासह शाहिस्ता इनामदार, अंजू गुर्जर (जोधपूर) आदींनी विचार मांडले. कार्यक्रमाला ॲड. भारत भूषण गुर्जर, ॲड. शांताराम महाजन, ॲड. विनोद पाटील, ॲड. जी. एम. पाटील, ॲड. एस. यू. चौधरी, ॲड. यशवंत महाजन यांच्यासह विविध मान्यवर अधिवक्त्यांची उपस्थिती होती. --------- इन्‍फो समाजाच्या प्रश्नांसाठी पुढाकार घ्यावा विविध राज्यांतून आलेल्या अधिवक्त्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी राष्ट्रीय पातळीवर परस्परांशी जोडले जाण्याची आवश्यकता व्यक्त केली. राजकीय नेतृत्वाची भूमिका बदलू शकते. मात्र, अधिवक्ता आपल्या कायदेविषयक ज्ञानाच्या माध्यमातून समाजासाठी सातत्याने काम करू शकतो. त्यामुळे समाजाच्या विकासात अधिवक्त्यांनी अधिक सक्रिय भूमिका बजावण्याची गरज असल्याचे मत परिषदेत व्यक्त करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यातही अधिवक्त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे आजच्या काळातही कायदे क्षेत्रातील व्यक्तींनी समाजाच्या प्रश्नांसाठी पुढाकार घ्यावा, असा सूर परिषदेत उमटला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com