Gurumauli Annasaheb More : कायदा आणि शिक्षणासाठी ‘गीता रहस्य’ उपयोगी : गुरुमाउली

Gurumauli Annasaheb More while guiding at Sri Swami Samarth Pradhan Kendra
Gurumauli Annasaheb More while guiding at Sri Swami Samarth Pradhan Kendraesakal

Gurumauli Annasaheb More : थोर राष्ट्रपुरुष लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिलेला ‘गीता रहस्य’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ भारतीय कायदा आणि शिक्षणासाठी अत्यंत उपयोगी आहे.

त्यामुळे कायद्यात आणि शिक्षणात या ग्रंथाचा वापर होणे उचित ठरेल, असे विचार श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली श्री अण्णासाहेब मोरे यांनी मांडले.

दिंडोरी प्रधान केंद्रात रविवारी (ता. २३) साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह पार पडला. (Gurumauli Annasaheb More guidance to use gita rahasya book in law and education nashik news)

पुरुषोत्तम मासानिमित्त दर्शन व आशीर्वादासाठी सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवेकऱ्यांना संबोधित करताना गुरुमाउली म्हणाले, की आज लोकमान्य टिळकांची जयंती आहे.

टिळकांचा देशाभिमान, परकियांविरोधात त्यांचा लढा, काळ्या पाण्याची शिक्षा हा त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास धगधगत्या अग्निकुंडासारखा आहे. आजच्या पिढीला त्यांचा जीवनादर्श समजून सांगणे गरजेचे आहे. त्यांनी मंडालेच्या तुरुंगात असताना भगवद्‌गीतेवर अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन करणारा ‘गीता रहस्य’ ग्रंथ लिहिला.

गीतेच्या १४ व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी कायद्याविषयी ज्ञान दिले आहे. या ज्ञानाविषयी ‘गीता रहस्य’मध्ये टिळकांनी सविस्तर लिहिले आहे. त्याचा उपयोग भारतीय कायद्यात आणि शिक्षणात होऊ शकतो, असे गुरुमाउलींनी स्पष्ट केले.

सेवामार्गाच्या विविध उपक्रमांविषयी माहिती देताना गुरुमाउली म्हणाले, की सेवामार्गाच्या स्वयंरोजगार विभागाने मासिक महासत्संगाच्या दिवशी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यांतर्गत एकाच दिवशी ३०८ सेवेकऱ्यांना विविध कंपन्या, एअरपोर्ट आणि बँकांमध्ये कायमस्वरूपी रोजगार मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More while guiding at Sri Swami Samarth Pradhan Kendra
Gurumauli Annasaheb More : प्रेम हाच खरा धर्म... हीच ‘गुरुमाउलीं’ची शिकवण : चंद्रकांतदादा मोरे

त्यामुळे ज्या सेवेकऱ्यांच्या मुला-मुलींच्या रोजगाराची समस्या आहे, त्यांनी स्वयंरोजगार विभागाकडे नावनोंदणी करावी आणि महिनाभराने मुलाखतीस यावे. दरमहा स्वयंरोजगार मेळावा आयोजित करण्याचा मानस आहे.

आजपावेतो सेवामार्गाच्या माध्यमातून तीन हजार ५०० बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. नोकरी मिळाल्यावरही संबंधितांनी सेवामार्गाशी कायम राहावे व जमेल त्याप्रमाणे सेवाकार्य करावे, अशी अपेक्षा गुरुमाउलींनी बोलून दाखविली.

रोज सायंकाळी ऑनलाइन भागवत पारायण

पुरुषोत्तम मासानिमित्त रोज सायंकाळी सातला सेवामार्गाच्या यू ट्यूब चॅनलवरून प्रसारित होणाऱ्या ऑनलाइन संक्षिप्त भागवत पारायणाचा सेवेकऱ्यांनी लाभ घ्यावा, तसेच गुरुपीठात सुरू असलेल्या याज्ञिकी प्रशिक्षणातही इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ३० जुलै ते ५ ऑगस्ट या काळात केवळ गुरुपीठातच ‘सुलभ भागवत सप्ताह’ आणि १, २, ३ सप्टेंबरला तीनदिवसीय ‘नवनाथ पारायण’ होणार आहे.

Gurumauli Annasaheb More while guiding at Sri Swami Samarth Pradhan Kendra
Gurumauli Annasaheb More : ‘ठायीच बैसूनि करा एकचित्त आवडी अनंत आळवावा’ : गुरुमाउली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com