Gurumauli Annasaheb More: आध्यात्मिक सेवेतून राष्ट्रविकास साधा : गुरुमाउली

दिंडोरी प्रधान सेवाकेंद्रात सत्संग समारोह
Gurumauli Annasaheb More while guiding at Pradhan Sevakendra. In the second photograph, sevakars and devotees from across the state
Gurumauli Annasaheb More while guiding at Pradhan Sevakendra. In the second photograph, sevakars and devotees from across the stateesakal

Gurumauli Annasaheb More : सेवेकरी बहुविध आध्यात्मिक सेवा करतात. या सेवेतून सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

या ऊर्जेचा वापर राष्ट्रविकासासाठी करावा, असे आवाहन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी केले. (Gurumauli Annasaheb More statement National development through spiritual service nashik )

दिंडोरी प्रधान सेवाकेंद्रात गुरुवारी (ता. ३) साप्ताहिक प्रश्नोत्तरे-मार्गदर्शन आणि सत्संग समारोह झाला. या वेळी राज्यभरातून आलेल्या सेवेकऱ्यांना गुरुमाउलींनी मार्गदर्शन केले.

सेवेकऱ्यांशी संवाद साधताना गुरुमाउली म्हणाले, की दर गुरुवारी आणि रविवारी दिंडोरी दरबारी स्वामींचा जनता दरबार भरतो. या दरबारात आर्त, पीडित, दु:खी, कष्टी, रोगी, मुमुक्षू असे सर्वच स्तरातील लोक आपापले प्रश्न घेऊन येतात.

ते सर्व लोक लेखी स्वरूपात प्रश्न मांडतात आणि घरी जाईपर्यंत स्वामी महाराज त्यांचे प्रश्नही सोडवत असतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. सात दशकांपासून ही सेवा विनामूल्य दिली जाते.

त्यामुळे गुरुवारी आणि रविवारी भरल्या जाणाऱ्या स्वामींच्या जनता दरबारात हजारोंच्या संख्येने दु:खी जनता येते. मात्र जाताना हसतमुखाने घरी जाते. ज्यांचे प्रश्न सुटतात, त्यांनी इतरांनाही सेवामार्गात आणावे, असे गुरुमाउलींनी नमूद केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gurumauli Annasaheb More while guiding at Pradhan Sevakendra. In the second photograph, sevakars and devotees from across the state
Gurumauli Annasaheb More : प्रखर राष्ट्रभक्त पिढी निर्माण व्हावी : गुरुमाउली अण्णासाहेब मोरे

गणेशोत्सवावर बोलताना गुरुमाउलींनी सांगितले, की सेवामार्गाने गोमायपासून बनविलेल्या गणेशमूर्तीमध्ये तीन आयुर्वेदिक वृक्षांच्या बिया आहेत. त्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन करण्याऐवजी त्याचे खड्ड्यामध्ये रोपण केल्यास कालांतराने आयुर्वेदिक वृक्ष जन्माला येतील आणि पर्यावरण संतुलनालाही मोलाची मदत होईल.

गणेशोत्सव साजरा करताना पोलिसांची मदत घ्यावी लागणार नाही, ध्वनिप्रदूषण होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, असा श्रद्धापूर्वक साजरा करावा आणि या काळात व नेहमीसुद्धा मुलांकडून गणेशस्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष पठण करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

आई भगवती सप्तश्रृंगी मातेच्या चरणी खानदेशातील एक हजार महिलांनी श्रीदुर्गा सप्तशतीचा एक हजार पाठ केला, अशी माहितीही त्यांनी दिली.

Gurumauli Annasaheb More while guiding at Pradhan Sevakendra. In the second photograph, sevakars and devotees from across the state
Gurumauli Annasaheb More : प्रत्येकाने 5 झाडे लावून संवर्धन करा : गुरुमाउली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com