esakal | गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन
sakal

बोलून बातमी शोधा

ghukta.jpg

रात्री वेळ ठरलेल्या नियोजनाप्रमाणे त्यांचे काम सुरु. पोलिसांना मात्र त्यांच्या कारनाम्याची खबर होतीच. सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची एंट्री होताच पोलिसांनी टाकली धाड. अन् सापडले हजारो किंवा लाखाचे नाही तर करोडचे घबाड. वाचा काय आहे प्रकार... 

गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

sakal_logo
By
सागर आहेर

नाशिक : (निफाड) रात्री वेळ ठरलेल्या नियोजनाप्रमाणे त्यांचे काम सुरु. पोलिसांना मात्र त्यांच्या कारनाम्याची खबर होतीच. सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांची एंट्री होताच पोलिसांनी टाकली धाड. अन् सापडले हजारो किंवा लाखाचे नाही तर करोडचे घबाड. वाचा काय आहे प्रकार... 

अशी आहे घटना

निफाड तालुक्यातील सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चितेगाव फाटा या ठिकाणी नवनियुक्त जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या खबरीनुसार गुजरातहुन औरंगाबाद येथे गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शनिवारी (ता. 3) रात्री उशिरा नाशिकचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, एपीआय दिवे तसेच सायखेडा येथील पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांच्या पथकाने कारवाई केली. यात एका ट्रकमधून सुमारे एक कोटीहुन अधिक रुपयांचा गुटखा हस्तगत केला. त्यामुळे जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

सायखेड्याचे पोलीस निरीक्षक अडसूळ यांनी याबाबत दुजोरा दिला. आतापर्यंतच्या हाती आलेल्या बातमीनुसार एक कोटी ६ लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांचा गुटखा हस्तगत केला आहे. एपीआय दिवे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस उपनिरीक्षक घनश्याम तांबे अधिक तपास करत आहे.

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

loading image
go to top