Latest Marathi News : सांडपाण्यातच संसार थाटण्याची वेळ; गटारीचे पाणी घरात | Nashik News Update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

An elderly woman draws water from a house Latest rain update news

Latest Marathi News : सांडपाण्यातच संसार थाटण्याची वेळ; गटारीचे पाणी घरात

जुने नाशिक : राजवाड्यास लागून असलेल्या मातंगवाड्यातील अनेक घरांना गटारीचे (Gutter) स्वरूप आले आहे. महापालिकेच्या (NMC) दुर्लक्षामुळे घरांना लागून असलेली गटर तुंबल्याने पाणी घरात शिरून आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

गटारींची दुरुस्ती करून सांडपाण्याच्या समस्येतून मुक्ती देण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. (Gutter water in house in matang wada Nashik Rain News Update)

तीन- चार दिवसापासून संततधार सुरू असल्याने मातंगवाड्यातील गटारी तुडुंब भरून नागरिकांच्या घरात गटारीचे पाणी शिरले आहे. यापूर्वीही काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे येथील काही घरांमध्ये गटारीचे पाणी शिरले होते.

याबाबतचे वृत्त प्रसारित होताच महापालिकेकडून गटारींची स्वच्छता करण्यात आली होती. त्यामुळे काही दिवस समस्या सुटली. परंतु, गेल्या तीन ते चार दिवसापासून पुन्हा पावसामुळे पूर्वीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

येथील चार ते पाच घरांमध्ये गटारीचे पाणी साचून घरांना तळ्याचे स्वरूप आले आहे. रहिवाशांना सारखा पाण्याचा उपसा करावा लागत आहे. सांडपाण्यातच संसार थाटण्याची वेळ रहिवाशांना आली आहे. आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

महापालिका अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी केल्या तरीदेखील दुर्लक्ष होत आहे. पाऊस वाढल्यास भयावह परिस्थिती निर्माण होण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त करत होते, ती भीती खरी ठरली. महापालिका आयुक्तांनी पाहणी करत येतील समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी रहिवासी करत आहे.

हेही वाचा: Ashadhi Ekadashi : ‘आषाढी एकादशी’ महाराष्‍ट्रीयन संस्‍कृती साता समुद्रापार

"ड्रेनेजचे पाणी थेट घरात घुसत असल्याने कुटुंबातील सदस्य पाणी उपसा करत आजारी पडले आहेत. याबाबात महापालिका प्रशासनाला कळविले पण कोणीही काही करायला तयार नाही. आम्ही नेमकी तक्रार कोणाकडे करायची." - विजय डांगळे, रहिवासी

"द्वारका परिसरातील पंडित जवाहरलाल नगर (मोठा मांतगवाडा) येथे गेले चार दिवसांपासून घरात ड्रेनेजचे पाणी घुसले असून, याबाबत मनपाच्या ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वत: फोन करून व्हॉटस ॲपवर व्हिडिओ, फोटो पाठवूनही यांची कुठलीही दखल घेण्यात आली नाही." - ज्ञानेश्वर काळे, अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस अनुसूचित जाती विभाग

हेही वाचा: Latest Marathi News : सिलिंडरच्‍या डिलिव्‍हरीचा ग्राहकांना आर्थिक भुर्दंड

Web Title: Gutter Water In House In Matang Wada Nashik Rain News Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..