विमान कंपन्यांना नाशिकचे पार्किंग; मेट्रो शहरांच्या तुलनेत कमी खर्चीक

nashik ozar airport
nashik ozar airportesakal

नाशिक : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या ओझर येथील विमानतळावर नाईट लॅण्डींगची व्यवस्था असल्याने पार्किंगसह विमानांचे सर्व्हिसिंग विमान कंपन्यांना परवडणारी आहे. विमानांच्या बाबतीत खर्च परवडणारा आहे त्याचप्रमाणे मेट्रो शहरांच्या तुलनेत अन्य खर्च कमी असल्याने त्या दृष्टीने कंपन्यांसाठी परवडणारे असल्याने विमान कंपन्यांकडूनच नाशिकमध्ये पार्किंगसह सर्व्हिसिंगची व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

नाशिकचे ओझर विमानतळ सर्वार्थाने परवडणारे आहे. येथे विमानांचे नाईट लॅण्डींगची व्यवस्था आहे. देशातील दुसऱ्या क्रमांकाची जवळपास साडेतीन किलोमीटर लांबीची धावपट्टी असल्याने बारा बोइंग विमाने पार्किंग होवू शकतात. एचएएल कारखान्यामुळे येथे विमानांच्या सर्व्हिसिंग अर्थात मेन्टेनन्स, रिपेरिंग व ओव्हर ऑईलिंगची (एमआरओ) व्यवस्था आहे. विमान कंपन्यांसाठी या बाबी परवडणाऱ्या आहेत.

त्याला कारण म्हणजे मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार्किंगसाठी जागा नसल्याने विमाने बडोदा, हैदराबादमध्ये पार्किंगसाठी जातात. त्याचप्रमाणे विमानांचे ठराविक अंतर कापले गेल्यानंतर सर्व्हिसिंगची आवश्‍यकता भासते. त्यामुळे सिंगापूर येथे विमाने सर्व्हिसिंगसाठी जातात.

nashik ozar airport
नाशिकला अपेक्षा हनुमान उडीची; HALमुळे विमानांचा ‘MRO’ शक्य

त्याऐवजी ओझर येथे एचएएलचा कारखाना असल्याने येथे विमानांचे कमी खर्चात एमआरओ शक्य असल्याने परवडणारा खर्च आहे. त्याचबरोबर मेट्रो शहरांच्या तुलनेत हॉटेल, एअर होस्टेजचा खर्च कमी असल्याने त्या दृष्टीनेदेखील कंपन्यांना खर्च परवडणार आहे. त्यामुळे या अर्थानेदेखील नाशिक (ओझर) विमानसेवा परवडणारी आहे.

कंपन्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष

ओझर विमानतळ सर्वार्थाने परवडणारे असले तरी शहरांच्या स्पर्धेत नाशिककडे दुर्लक्ष होत आहे. कंपन्यांनादेखील नाशिक परवडणारे आहे, ही बाब माहीत आहे. केंद्रीय स्तरावर ओझर विमानतळावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

nashik ozar airport
नाशिक शहरात 10 ठिकाणी स्मार्ट पार्किंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com