ओझर : येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक विभागाला हलक्या लढाऊ विमान तेजस ‘एमके वन ए’ला उड्डाण मंजुरी मिळाल्याने एरोस्पेस क्षेत्रात भारताने महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अतिरिक्त महासंचालक कार्यालयाने संरक्षण मंत्रालयाच्या गुणवत्ता आश्वासन विभागाच्या एडीजी (अधिकारी महासंचालक) यांच्या हस्ते ओझर विभागाच्या कार्यकारी संचालकांना मंजुरीच्या परवानगीचे पत्र सोमवारी (ता. ११) सुपूर्द केले.