SNR26B23159
पाटपिंप्री ः जिल्हा परिषद शाळा नूतन वास्तूचे उद्घाटन करताना शिशिर कुमार पात्र. समवेत वरिंदरकुमार, संजय चौधरी, सौम्या बेहरा आदी.
---------------------
‘एचएएल’तर्फे पाटपिंप्री येथे
दोन कोटींची शाळा इमारत
-------------
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता.१९ ः पाटपिंप्री येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस एचएएलने सीएसआर निधीमधून एक कोटी ९५ लाख रुपयांची इमारत बांधून दिली. त्याचे उद्घाटन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिरकुमार पात्र यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
वरिंदरकुमार, संजय चौधरी, सौम्या डी. बेहरा, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी कैलास सांगळे, केंद्र समन्यवक विजय बागूल, गायधनी यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी, विकास संस्थेचे पदाधिकारी, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. कंपनीने सहा वर्ग खोल्या, एक कार्यालय, एक संगणक कक्ष, स्वच्छतागृह बांधून दिले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी पात्र यांनी शाळेला इमारत दिली असून आता खऱ्या अर्थाने ज्ञान मंदिरात रूपांतर करावे असे आवाहन केले. विस्तार अधिकारी बागूल यांनी चांगला आदर्शच समाज पुढे नेतो, म्हणून वाडी वस्तीवरील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत अशा सुविधांचा लाभ पोहोचवण्यासाठी एचएएलने भविष्यातही हे कार्य चालू ठेवावे, असे आवाहन केले. कैलास सांगळे साहेब यांनी वास्तूचे आदर्श ज्ञानमंदिरात रूपांतर होईल असा विश्वास बोलून दाखवला. सोमनाथ उगले यांनी प्रास्ताविक केले. भाऊसाहेब मोरे, सुरेश उगले यांनी सूत्रसंचालन केले. बापू उगले यांनी आभार मानले.
-------------------