HALचे काम बंदबाबत कामगार संभ्रमात! जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पण कामगार अनभिज्ञ

कारखान बंद असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. कारखाना बंदच्या आदेशाची ‘एचएएल’ व्यवस्थापनाने माहिती न दिल्याने कामगारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती.
hal employee
hal employeeesakal
Updated on

ओझर (जि. नाशिक) : देशाच्या संरक्षण व्यवस्थेचा कणा समजल्या जाणाऱ्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड(HAL) म्हणजेच नाशिक विभागातील एचएएलच्या ओझर व परिसरात राहणारे कामगार बुधवारी (ता. १२) दुपारी कामावर आले. मात्र, कारखान बंद असल्याने अनेकांचा गोंधळ उडाला. जिल्हाधिकाऱ्यांनी १० मेस काढलेल्या कारखाना बंदच्या आदेशाची ‘एचएएल’ व्यवस्थापनाने माहिती न दिल्याने कामगारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली होती. (Workers are confused about the closure of HAL's work)

कामगारांना विनाकारण मन:स्ताप

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२ ते २३ मेपर्यंत कडक लॉकडाउन(Lockdown) जाहीर केला आहे. त्यात ‘एचएएल’ कारखानाही बंद ठेवण्याबाबतचा आदेश १० मे ला काढला होता. मात्र, व्यवस्थापनाने या आदेशाची कल्पना कामगारांना दिलीच नाही. परिणामी, बुधवारी कामगार नेहमीप्रमाणे कामावर आले तेव्हा त्यांना घरी जाण्यास सांगितले. मात्र, व्यवस्थापनाने वेळेत माहिती न दिल्याने आम्हाला विनाकारण मन:स्ताप सहन करावा लागल्याचा आरोप कामगारांनी केला.

hal employee
नाशिकच्या कांद्यासमोर पाक, चिनी कांद्याचे आव्हान!
hal employee
मिरची चिरल्यानंतर हाताची जळजळ होते? मग 'हे' उपाय नक्की करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com