esakal | सरकारच्या कायद्यापूर्वीच येवल्यात ११ वर्षांपासून मिळतंय हॉलमार्क असलेलं सोनं! ग्राहकांना होतोय फायदा
sakal

बोलून बातमी शोधा

gold

हॉलमार्कच्या सक्तीने ग्राहकांना फायदा; बिनधास्त सोने खरेदी

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : सोने (gold) किती अस्सल अन्‌ किती कॅरेटचे हे ओळखणे तसे अवघडंच! पण, आता केंद्र शासनाने हॉलमार्क (hallmark gold) सक्तीचा निर्णय केल्याने ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सोने विश्‍वासाने मिळणार आहे. आपण घेत असलेल्या सोन्यावरच हॉलमार्कचा उल्लेख येणार असल्याने ग्राहकही आता बिनधास्तपणे सोने खरेदी करू शकतील. विशेष म्हणजे येवल्यात २०१० पासून भारत सरकारच्या हॉलमार्कचे दागिने ग्राहकांना मिळत आहेत. (Hallmark-will-give-consumers-pure-gold-nashik-marathi-news)

हॉलमार्कच्या सक्तीमुळे ग्राहकांना मिळणार शुद्ध सोने

सोन्या-चांदीचा व्यापार हा अनादीकाळापासून सुरू आहे. सर्वच सोने शुद्ध नसते आणि त्यामुळे ग्राहकांचे सोने मोडताना घटच्या नावाखाली २० ते २५ टक्के नुकसान होते. त्यामुळे ग्राहकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी हॉलमार्किंगचा कायदा आला असून, त्याची सक्ती करण्यात आली आहे. सोन्याचे दागिने हौसेसाठी घेतले जातात. तसेच, गुंतवलेला आपला पैसाही सोन्यात सुरक्षित राहत असल्यामुळे सोन्यात गुंतवणूकही वाढली आहे. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी हॉलमार्क सक्तीच्या निर्णयाचे ग्राहकांकडून स्वागत होत आहे. सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग प्रमाणपत्र असेल, तरच हे दागिने सोनार विकू शकणार असून, आता १४, १८ कॅरेट रियल डायमंडमध्ये आणि सोन्याचे दागिने २२ कॅरेटचेच दागिने विकू शकणार आहेत.

हेही वाचा: नाशिककर ‘सडन डेथ’ने चिंतित; मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक

ग्राहकांकडून सोने खरेदीला पसंती

देशातील २५६ जिल्ह्यांसाठी हॉलमार्क सक्ती झाली असून, यात नाशिकचाही समावेश आहे. विशेष म्हणजे येथील पूजा ज्वेलर्स यांनी २०१० पासूनच ग्राहकांच्या हितासाठी हॉलमार्कच्या दागिन्यांची विक्री करणे सुरू केले आहे. यामुळे अनेक ग्राहकांचा विश्‍वास संपादन झाला असून, या दागिन्यांना ग्राहकांकडून खरेदीला पसंती मिळत आहे. अनेक ग्राहकांनी हॉलमार्कमुळे खात्रीशीर सोने मिळत असल्याची प्रतिक्रिया दिली असून, यापुढे आम्ही ग्राहकांना अशीच दर्जेदार सेवा देत राहू, असा विश्‍वास पूजा ज्वेलर्सचे संचालक सुदेश रोडा यांनी व्यक्त केला.

कसे ओळखावे हॉलमार्किंगचे दागिने...

प्रत्येक सोन्याच्या दागिन्याच्या मागच्या बाजूला सूक्ष्म आकारात काही आकडे आणि अक्षरे कोरलेली असतात. ही अक्षरे असली की तुमच्याकडचे सोने हॉलमार्कवाले आहे, असे लक्षात येते. यात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) चा लोगो, त्यानंतर दागिन्यात सोन्याचे प्रमाण किंवा शुद्धता नेमकी किती आहे तो आकडा आणि त्यानंतर सोन्याची शुद्धता ज्या केंद्रात तपासण्यात आली आहे त्या केंद्राचा लोगो असतो. तर, सगळ्यात शेवटी सोनाराचा स्वत:चा लोगो असतो. विशेष म्हणजे बीआयएस केअर या ॲपमध्ये जाऊन ग्राहक आपल्या सोन्याविषयी सविस्तर माहितीदेखील मिळवू शकणार आहे.

हेही वाचा: आशादायक! गुन्हेगारी सोडू इच्छिणाऱ्यांना पोलिसांकडुन संधी

२०१० पासून मिळताहेत हॉलमार्कचे दागिने

ग्राहकांना शुद्ध सोन्याचे दागिने मिळण्यासाठी हॉलमार्क खूपच उपयुक्त आहे. शासनाच्या निर्णयामुळे आता ग्राहकदेखील जागरूक होणार असून, परिपूर्ण शुद्धतेचे दागिने खरेदीचा अधिकार त्यांना मिळाला आहे. ग्राहकांच्या हितासाठी आम्ही दहा वर्षांपासून हॉलमार्कचे दागिने विक्री करत आहोत. आमच्याकडे वैजापूर, निफाड, विंचूर, लासलगाव, मनमाड, नांदगाव, सिन्नर येथून विश्‍वासाने दागिने घेण्यासाठी ग्राहक येतात. - सुदेश रोडा, संचालक, पूजा ज्वेलर्स

loading image