NGL26B04130
शिंदखेडा : हातपंप दुरुस्तीचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देताना कल्याण बागल, वासुदेव शिंदे.
--------
निमगूळमधील हातपंपाची दुरुस्ती करा
शिवसेना पदाधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
निमगूळ, ता. २७ : शिंदखेडा तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तालुक्यातील प्रत्येक गावात हातपंप आहेत. मात्र, त्याची परिस्थिती पाहता ते बहुतेक बंद स्थितीत आहेत. दुष्काळी परिस्थिती पाहता भविष्यात पाण्याचा संभाव्य परिस्थितीला सामना करण्यासाठी गावातील हातपंप दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी शिवसेना धुळे जिल्हा उपसंघटक कल्याण बागल यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शिंदखेडा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी निमगूळसह तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना आपल्या स्तरावरून नवीन हातपंप बसविण्यासह नादुरुस्त पडलेल्या हातपंपाची तत्काळ दुरुस्तीच्या सूचना द्याव्यात. तसेच, शेतात काहीवेळा भारनियमन असते. त्यामुळे गावात उपाययोजना म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय हातपंपाने होऊ शकते. तसेच, भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई होण्याची दाट शक्यता आहे. पूर्व नियोजन म्हणून तत्काळ हातपंप दुरुतीचे करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा उपसंघटक कल्याण बागल यांनी गटविकास अधिकारी स्मृती करांडे यांच्याकडे केली आहे.