Nashik News: अनाथांच्या जीवनात आनंदतरंग! महिला बाल विकास विभागातर्फे माया-अंबादास अडकले विवाह बंधनात

Happiness in life of orphans Maya Ambadas got married by Women and Child Development Department
Happiness in life of orphans Maya Ambadas got married by Women and Child Development Departmentesakal

नाशिक : बालपणापासून अनाथ आणि एकाकी आयुष्य घेऊन वाढलेले अंबादास आणि माया यांचा विवाह झाला. आज अनेकांच्या आशीर्वाद अन् शुभेच्छाच्या वर्षवात ते न्हाऊन निघाले.

शासकीय मुलींचे अनुरक्षणगृह हेच माहेर असलेली माया राहुल खोकरे आणि मुंबईतील अंबादास बबन आवळे यांच्या रविवारी (ता. ३) बगई बँक्वेटमध्ये महिला व बालकल्याण विभागातर्फे झालेल्या विवाहात श्रीकांत व श्रेया भारतीय यांनी खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले आदींसह शेकडोंच्या उपस्थितीत कन्यादान केले. (Happiness in life of orphans Maya Ambadas got married by Women and Child Development Department Nashik News)

शासकीय मुलींच्या अनुरक्षणगृह संस्थेत वाढलेल्या माया बारावीनंतर ए.एन.एम. (अॅक्झिलरी नर्सिंग मिडवाईफ) हे शिक्षण, तसेच एमएस-सीआयटी, बेसिक टेलरिंग, अॅडव्हान्स ड्रेस मेकिंग, इमिटेशन व फॅनिक ज्वेलरी मेकिंग कोर्सेस बेजन देसाई फाउंडेशनच्या मदतीने पूर्ण केले आहे

७ जून २००१ मध्ये जन्मलेली माया आईच्या मृत्यूनंतर साधारण वयाच्या तिसऱ्या वर्षापासून मनोरम सदन, मुलींचे बालगृह, निरीक्षणगृह आणि शासकीय मुलींच्या अनुरक्षणगृहातच लहानाची मोठी झाली.

तर वर अंबादास आवळे हे संस्थेचा विद्यार्थी २ मे २०२१ पासून मुंबई पोलिस दलात कार्यरत असून, मरूळ मुख्यालय, मुंबई येथे त्यांची पोस्टिंग आहे.

Happiness in life of orphans Maya Ambadas got married by Women and Child Development Department
Success Story : ‘शाळा सोडून तू स्वयंपाक कर’, शिक्षकांनी मारलेल्या टोमण्यावर चिडून तिने भरारी घेतली थेट NASA मध्ये पोहोचली

दोघांची परस्पर पसंती, कागदपत्रांची पूर्तता, वैद्यकीय सक्षमता दाखला, चरित्र पडताळणी अहवाल, उत्पन्न दाखला, गृहभेट अहवाल आदींच्या परिपूर्णतेनंतर विवाहाचा प्रस्ताव जिल्हा महिला व बालविकास विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे यांनी पुढाकार घेत विवाहाला मान्यता दिली.

‘तर्पण’चा पुढाकार

तर्पण फाउंडेशनने विवाहासाठी हॉल, जेवण, मंडप, वधू पोशाख आदींची व्यवस्था केली. श्रीकांत भारतीय व श्रेया भारतीय या दांपत्याने मायाचे कन्यादान केले. विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी विवाहाला उपस्थित होते.

Happiness in life of orphans Maya Ambadas got married by Women and Child Development Department
Godavari Parikrama: गोदावरी परिक्रमेला विधिवत सुरवात; वैष्णव संप्रदायातील साधूंचा जथ्था निघाला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com