Happy New Year 2024: दुःख,संकटे विसरू, नव्या वर्षांत नव्याने उभे राहू! अपेक्षा ठेवत 2024चे जल्लोषात स्वागत

दुःख मनाला न कवटाळत आता नव्या वर्षाचे आनंदाने स्वागत करून पुन्हा येणाऱ्या संकटांना झुंज देत यशस्वी होऊ या...
Happy New Year 2024
Happy New Year 2024 esakal

येवला : मागील वर्षाचे स्मरण जागता,

दाटून येते मनामधे भय!

स्वतः स्वतःला देत दिलासा,

पुसतो डोळे हसता हसता

उभा इथे मी पसरून बाहू

नवीन वर्षा तुझ्या स्वागता!!

या कवयित्री शांता शेळके यांच्या काव्यपंक्तीची आठवण करीत गेलेले २०२३ वर्ष विविध पटलावर संकट आणि दुःख आणणारे गेले. मात्र, दुःख मनाला न कवटाळत आता नव्या वर्षाचे आनंदाने स्वागत करून पुन्हा येणाऱ्या संकटांना झुंज देत यशस्वी होऊ या, असा निश्चय बाळगत प्रत्येकानेच जुन्या वर्षाला अलविदा करून नव्या वर्षाचे हर्षोल्हासात स्वागत केले.

शेतकऱ्यांसाठी गेलेले वर्ष कधी न विसरणारे आहे. जानेवारीपासूनच कांद्यासह शेतमालाच्या भावाचा गुंता वाढला आणि वर्षभरात अर्थव्यवस्था खिळखिळी झाली. शेतकऱ्यांचे अब्जावधीचे नुकसान झाले.

जून-जुलैपासून वरूणराजाची वक्रदृष्टी झाली आणि पेरणी केलेली पिके हळूहळू करपू लागली. दिवाळीपर्यंत शेतात पिकांचा पालापाचोळा झाला. पाणी होते त्यांनी पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न केला.

वर्षाच्या शेवटी आला बेमोसमी पाऊस, ढगाळ हवामान, पिकांवर रोग, कांद्याचे घसरलेले बाजारभाव यातच वर्ष संपले. टंचाईग्रस्त तालुक्यात पिण्याच्या पाण्याची साडेसाती वर्षभर पुरली. येवला, देवळा, नांदगाव भागांत वर्षभर टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागला.

Happy New Year 2024
New Year Celebration : 'वेलकम 2024', देशभरातील लोकांनी जल्लोषात केले नवीन वर्षाचे स्वागत, पाहा व्हिडीओ

नवे वर्ष, नवा हर्ष

नव्या वर्षाच्या तोंडावरच पुन्हा कोरोना, थंडावलेल्या बाजारपेठेचा अन्‌ अस्थिर राजकारणाचा धोका वाढला, तरी न डगमगता नव्या अपेक्षेने उभे राहू या, नव्या जिद्दीने मोडलेला कणा पुन्हा सावरू या, असा संकल्प सर्वांनीच केला.

सर्वत्र स्वागताची धूम

सरत्या वर्षाला निरोप व नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. ३१ डिसेंबरनिमित्त सकाळपासूनच सोशल मीडियावर नव्या वर्षाच्या स्वागताची व शुभेच्छांची रेलचेल होती. कुठे कौटुंबिक स्नेहमिलन, तर कुठे साग्रसंगीत पार्ट्या रंगल्या.

रात्री फटाक्यांची आतषिबाजी करून नव्या वर्षाचे स्वागत झाले. येणाऱ्या वर्षात सुट्टी, लग्नतिथी, भविष्य आदींची इंत्यभूत माहिती सोशल मीडियाने दिली. नव्या वर्षात काय-काय संकल्प करावे, काय-काय चांगले काम करावे, या टीप्स देणाऱ्या पोस्टही फिरल्या.

"नव्या २०२४ वर्षाच्या बेरजेत ८ ही समसंख्या असून, हे वर्ष आंनददायी जाण्याचे संकेत आहेत. शिवाय निश्चितच समाधान देणारे असून, मोठ्या उत्साही घटना घडणार आहेत. साथीच्या आजाराचा धोका कमी आहे. शेती व औद्योगिक क्षेत्राला लाभदायक वर्ष असेल. संयमी होऊन आईवडिल, गुरू व कुलदेवतेची सेवा करावी. विशेषत: नव्या पिढीने धर्म व सत्य आचरणाची वाट धरावी."-डॉ. प्रसादशास्त्री कुलकर्णी, पंचांग अभ्यासक, येवला

Happy New Year 2024
Happy New Year 2024 : संपूर्ण वर्षभर राहाल मालामाल; नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी करा हे उपाय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com