
आदिमायेच्या दरबारी हापुस आंब्यांची मनमोहक आरास
वणी (जि. नाशिक) : साडेतीन मुहूर्तापैकी एक अशा पवित्र सणानिमित्त साडेतीन शक्तीपिठांपैकी स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी मातेच्या (Saptashrungi Devi) दरबारात फळांचा राजा असलेल्या आंब्यांची मनमोहक आरास करुन आंब्यांचा महानैवद्य अर्पण करुन अक्षय तृतीयेचा (Akshay Tritiya) सण उत्साहात साजरा करण्यात आला. (Hapus Mango Decoration in Saptashrungi devi temple occasion of akshaya tritiya Nashik News)
अक्षय तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र अशा सणानिमित्त आज सकाळी सात वाजता सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट कार्यालयात आदिमायेच्या सोन्याच्या विविध अलंकाराचे पुजन करुन डफाच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. दरम्यान आजची आदिमायेची पंचामृत महापूजा देणगीदार भाविकांच्या हस्ते संपन्न झाली. प्रांरभी आदिमायेस हिरव्या रंगाचे भरजरी महावस्त्र नेसवून सोन्याचे मुकुट, पुतळ्याचे गाठले, कमर पट्टा, जोडे, कर्णफुले, नथ, चांदीची पावले आदी सोन्याची आभुषणे घालीत साजशृंगार करण्यात आला होता.
हेही वाचा: Malegaon : बहिणीने स्वत:चे यकृत देऊन भावाला दिले जीवदान
अक्षय तृतीयेच्या दिवशी उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. त्यानूसार आज नाशिक येथील भाविक प्रशांत काळे यांनी आदिमायेच्या चरणी अकराशे नग (तीनशे किलो) रत्नागिरी हापुस आंबे अर्पन करीत आदिमायेच्या मंदिरात अवधुत देशपांडे यांच्या माध्यमातून मंदिरात आंब्यांची तसेच आंब्याची पाने व फुलांची आकर्षक आरास करुन घेतली. यावेळी इस्टेट विभाग प्रमुख प्रकाश पगार, मंदीर प्रमुख सुनिल कासार, नारद अहिरे, पहिली पायरी प्रमुख मुरलीधर गायकवाड आदींसह प्रमुख अधिकारी, पुरोहित वृंद उपस्थित होते. आज दिवसभर भाविकांची मंदिरात गर्दी होती.
हेही वाचा: Womens Cricket : 'BCCI'च्या शिबिरासाठी ईश्वरी सावकारची निवड
Web Title: Hapus Mango Decoration In Saptashrungi Devi Temple Occasion Of Akshaya Tritiya Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..