नाशिक : कोकणचा राजा 'हापूस' लासलगावमार्गे अमेरिकेला रवाना

hapus mango
hapus mango sakal

लासलगाव (जि. नाशिक) : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या (corona) प्रादुर्भावामुळे परदेशात शेतीमालाच्या निर्यातीवर परिणाम झाला होता, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने फळांचा राजा म्हणून ओळख असलेला कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगावमार्गे अमेरिकेत (America) सुरु झालेली आहे. लासलगाव येथील भाभा अणु संशोधन केंद्रातून हापूस, केशर, बदाम या जातीच्या आंब्यावर विकिरण प्रक्रिया होऊन पहिल्या कंटेनरमधून तीन टन आंबे ९५० पेटीतून अमेरिकेला रवाना झाला आहे.

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीने अवघ्या जगावर अधिराज्य गाजवणार्‍या भारतातील हापूस आंब्याची अमेरिकेतील नागरिकांना भारतीय आंब्याची भुरळ पडल्याने आंब्याची मागणी वाढली आहे दर्जेदार द्राक्षे आणि कांदा निर्यातीत पुढाकार घेतल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव आता आंब्याच्या निर्यात केंद्र म्हणून वेगाने पुढे येत आहे

फळमाशीच्या प्रादुर्भावाचे कारण युरोपियन महासंघाने भारतातून आयात होणाऱ्या हापूस आंब्यावर २०१३ मध्ये बंदी घातल्याने फाळांचा राजा असलेल्या हापूसचे आता काय होणार, ही चिंता होती; पण ती कायमस्वरूपी मिटली आहे. गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने ठरवून दिलेल्या मापदंडाचे काटेकोर पालन होत असल्याने भारतीय हापूस आंब्याची मोठ्या झपाट्याने अमेरिका व ऑस्ट्रेलियाच्या (Australia) दिशेने कूच करू लागला आहे.

hapus mango
Nashik | आता ॲपद्वारे मिळणार पाणीपट्टी बिल

२० जुलैपर्यंत होणार प्रक्रिया

१२ एप्रिल ते २० जुलै या कालावधीत लासलगावच्या या केंद्रात मुंबईच्या अँग्रो सर्च या कंपनीतर्फे विकिरण प्रक्रिया केली जाणार आहे. लासलगाव येथे ३१ ऑक्टोंबर २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या लासलगाव येथील कृषी उत्पादन संशोधन केंद्र येथे हा प्रकल्प कांद्यासाठी तयार करण्यात आला होता. मात्र, येथे आता मसाले व आंब्यावरही येथेच विकिरण करून तो निर्यात केला जात आहे. अमेरिकेत जाणाऱ्या आंब्यामध्ये हापूस, केशर, दशरा, बेंगणपल्ली, लंगडा या प्रमुख जातींचा समावेश आहे.

या देशात होते निर्यात...

लासलगाव येथून आंब्यावर विकिरण प्रक्रिया पूर्ण करून हा हापूस सॅन फ्रान्सिस्को, लॉस एन्जेलिस, शिकागो, न्यू जर्सी, हय़ूस्टन, कॅलिफोर्निया, न्यूयॉर्क या शहरांमध्ये पाठविला जाणार आहे .

विकिरण प्रक्रिया म्हणजे?

लासलगावच्या केंदात गॅमा किरणांचा ४०० ते ७०० ग्रे मात्रा विकिरण मारा करून आंब्याची साठवणूक क्षमता वाढवली जाते. यामुळे आंबा पिकण्याची क्रिया तर लांबतेच, शिवाय कोयीतील कीड नष्ट होते. आंब्यातील साका (सफेद गाठ) निमिर्तीची प्रक्रिया ही थांबते कीड रोखण्यास हा अतिशय चांगला उपाय मानला जातो. उष्णतेचा वापर न करता ही प्रक्रिया होत असल्याने आंब्याचा स्वाद व ताजेपणा टिकून राहण्यास मदत होते.

31 ऑक्टोंबर 2002 ला तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांनी कृषक चे उद्घाटन केले होते सुरुवातीला हा प्रकल्प फक्त कांद्यासाठी केला होता मात्र आता आंब्यावर प्रक्रिया करून अमेरिका व ऑस्ट्रेलिया येथे निर्यात केली जाते 2015 नंतर बाबा अनुसंधन केंद्रा ची कराड संपल्याने हा प्रकल्प मुंबईच्या "ऍग्रो सर्च" खाजगी कंपनीकडे हस्तांतरित केला होता. या प्रकल्पाचे M.D. हर्षद जोशी व E.D प्रणव पारेख व विकिरण प्रक्रिया आधिकारी संजय आहेर बघत आहे.

hapus mango
सत्तेसाठी फडणवीसांचा जीव गुदमरतोय, 'या' नेत्याने केली टीका

''यंदाच्या हंगामातील पहिल्या साडेसात मेट्रिक टन आंब्यावर विकिरण प्रक्रिया करून हा आंबा व्यापाऱ्याकडून अमेरिकेला पाठविण्यात आला आहे गेल्या वर्षी कोरोनामुळे आंबा लासलगाव येथे विकिरण प्रकियेसाठी आला नाही. यावर्षी मात्र ७०० ते ८०० मेट्रिक टन आंबाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे.'' - संजय आहेर, विकिरण प्रक्रिया अधिकारी भाभा अणू संशोधन केंद्र, लासलगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com