धुळे : टुडे पान ४ साठी..
---
फोटो क्रमांक : 31945
दोंडाईचा : धनुर्विद्या स्पर्धेत यशस्वी हस्ती स्कूलचे विद्यार्थी. शेजारी प्राचार्या रजिया दाऊदी यांच्यासह प्रशिक्षक.
---
हस्ती स्कूलच्या विद्यार्थ्यांचे धनुर्विद्या स्पर्धेत यश
जिल्हास्तरीय स्पर्धेतून विभागस्तरावर ४६ खेळाडूंची निवड
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. ११ : क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोंडाईचा येथील हस्ती क्रीडासंकुल येथे जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सर्वच वयोगटांत यश मिळवून विभागस्तरावर प्रवेश निश्चित केला.
प्राचार्या रजिया दाऊदी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. शालेय स्तरावरील १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटांतील मुला-मुलींनी आपल्या उत्कृष्ट चातुर्य व क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. स्पर्धेत १४ वर्षे वयोगटांत आठ मुले व सात मुली, १७ वर्षे वयोगटांत नऊ मुले व आठ मुली, तर १९ वर्षे वयोगटांत सहा मुले व आठ मुली, अशा एकूण ४६ विद्यार्थ्यांनी विजय मिळवत विभागस्तरावर धडक मारली. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष उद्योगपती अशोक जैन, कार्याध्यक्ष किशोर जैन, हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन कैलास जैन, संचालक मंडळ, प्राचार्या रजिया दाऊदी यांनी कौतुक केले. खेळाडूंना क्रीडाशिक्षक प्रकाश खंडेराय यांचे मार्गदर्शन झाले. विशाल पवार, दुर्गेश पवार, दिनेश माळी, मेघराज बैसाणे, तसेच क्रीडाशिक्षिका पुष्पा साळवे, कामिनी पाटील व अश्विनी गिरासे यांनी संयोजन केले.