(धुळे टुडे १ साठी अँकर...)
NSK26H31351
तांडे (शिरपूर) : जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत यशप्राप्त हस्ती स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या संघांसह मान्यवर.
--------
‘हस्ती’च्या संघांची विभागस्तरावर धडक
जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत यश
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता.४ : हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या फुटबॉल संघांनी जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट व कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत जिल्हास्तरावर दणदणीत विजय मिळविला. या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर हस्ती संघांची विभागस्तरावर स्तुत्य निवड झाली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने तांडे (शिरपूर) येथील एम. आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा झाली. या स्पर्धेत हस्ती स्कूलचा १७ व १९ वर्षांखालील संघांनी सहभाग घेतला.
हस्ती स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपांत्य सामन्यात प्रचिती इंग्लिश मीडियम स्कूल (साक्री) संघाचा ६-१ असा पराभव केला. तर अंतिम सामन्यात एम. आर. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल (शिरपूर) संघाचा ३-१ ने पराभव केला. तसेच १९ वर्षांखालील मुलांच्या संघाने उपांत्य सामन्यात सैनिकी शाळा (मोराणे) या संघाचा ६-० असा पराभव केला. अंतिम सामन्यात एम. आर. पटेल मिलिटरी स्कूल (शिरपूर) संघावर ३-१ अशी मात करत विजेतेपद मिळविले.
या दोन्ही संघांनी संपूर्ण स्पर्धेत शिस्तबद्ध सांघिक खेळ, उत्कृष्ट पासिंग, आक्रमक चाली आणि प्रभावी बचावाचे दर्शन घडविले. या कामगिरीमुळे हस्ती स्कूलच्या दोन्ही संघांनी विभागीय फुटबॉल स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या यशाबद्दल हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योगपती अशोक जैन, कार्याध्यक्ष किशोर जैन, हस्ती ग्रुप ऑफ स्कूलचे चेअरमन कैलास जैन, प्राचार्या रजिया दाऊदी, प्रशासकीय अधिकारी रेखा गाडेकर यांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना क्रीडा विभागप्रमुख प्रकाश खंडेराय व दुर्गेश पवार यांचे मार्गदर्शन लाभले.