यंदा निम्म्यापेक्षाही कमी विसर्ग

यंदा निम्म्यापेक्षाही कमी विसर्ग
Published on: 
मेनफिचर शहर-जिल्हा टुडे पान एकसाठी ------------ (सूचना : आकडेवारी आहे, आकर्षक पद्धतीने ग्राफीक्स डिझाईन करणे) ------------------------- NSK26H31162 पूर्व जळगाव जिल्ह्यासाठी संजीवनी ठरणरा हतनूर प्रकल्प. (संग्रहित छायाचित्र) ------- ‘एल- निनो’चा फटका.. विसर्गात हतनूरचा हात ‘आखडता’! -------- आतापर्यंत ९० ‘टीएमसी’ पाणी सोडले; दहा वर्षांत तिसऱ्यांदा निचांक सचिन जोशी : सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २ : एरवी दरवर्षी दोन-अडीचशे ‘टीएससी’पेक्षाही अधिक पाणी एकट्या हतनूर धरणातून सोडले जात असताना यंदा ‘एल-निनो’च्या प्रभावाचा हतनूर धरणामधील पाण्याच्या विसर्गालाही मोठा फटका बसला आहे. गेल्या दहा वर्षांतील आकडेवारी पाहता यंदा तिसऱ्यांदा निचांकी विसर्गाची नोंद झाली आहे. यावेळी सप्टेंबरअखेर अवघ्या ९० ‘टीएमसी’ पाण्याचाच विसर्ग होऊ शकला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या पावसाळ्यात केवळ चार-पाच वेळाच हतनूर धरणाचे दरवाजे उघडण्याची वेळ आली असून, एकदाही सर्व दरवाजे पूर्णक्षमतेने खुले करण्यात आले नाहीत. ‘हतनूर’ हे भुसावळ तालुक्यात तापी नदीवरील मध्यम स्वरुपाचे धरण. भुसावळसह मुक्ताईनगर, रावेर तालुक्यांसह पूर्व जळगाव जिल्ह्याला समृद्ध करणारा हा प्रकल्प तापीवरील महत्त्वपूर्ण प्रकल्प मानला जातो. विदर्भातून वाहत येणारी पूर्णा नदी मुक्ताईनगर तालुक्यात तापीला मिळते. या दोन्ही नद्यांच्या संगमातून पाण्याचा मोठा प्रवाह हतनूरला भरभरुन पाण्याचे दान देतो. १९८२मध्ये पूर्ण झालेल्या या प्रकल्पाचे पाणलोट क्षेत्र तब्बल २९ हजार ४३० चौरस किलोमीटर आहे. धरणाची क्षमता ३८८ एमसीएम (१३७०० द.ल.घ.मी.), तर जीवंत साठा २५५ एमसीएम (९ हजार द.ल.घ.मी.) आहे. १४-१ दरवर्षी सरासरी दोनशे टीएमसी विसर्ग एरवी इतर कोणतेही मोठे, मध्यम अथवा जिल्ह्यातील लघुप्रकल्प भरत नसतील. पण, तापी-पूर्णाच्या कृपेने हतनूर धरण मात्र दरवर्षी दोन-चार वेळा नक्कीच १०० टक्के भरते आणि त्यातून बऱ्याचदा पाण्याचा विसर्ग सोडावा लागतो. गेल्या काही वर्षांमधील पावसाळ्यांमध्ये हतनूर भरण्याची स्थिती पाहिली असता, अपवादवगळता हतनूर धरणाने जिल्ह्याच्या शेतीला कधीही दगा दिलेला नाही. दर वर्षाच्या पावसाळ्यात, १५ ऑक्टोबरपर्यंतची स्थिती लक्षात घेता हतनूरमधून आठ-दहा, काही वर्षी, तर अनेकदा पाण्याचा विसर्ग सोडावा लागला. साधारण सरासरी दोनशे टीएमसीपेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सोडला जातो, अशा नोंदी आहेत. ‘ते’ सलग दोन वर्षे कमी विसर्ग हतनूरमधील पाण्याच्या विसर्गाला २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षांत यंदापेक्षाही मोठा फटका बसला. अर्थात, त्या दोन्ही वर्षी यंदासारख्या भीषण दुष्काळाची स्थिती नव्हती. मात्र, प्रत्यक्षात तापी-पूर्णा नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस न झाल्याने या दोन्ही वर्षी हतनूरमधून अनुक्रमे ५६ व ७६ ‘टीएमसी’ पाण्याचा विसर्ग झाल्याच्या नोंदी आहेत. -------- १४-१ ‘एल-निनो’ विसर्गाला फटका यंदा ‘एल-निनो’ घटक प्रभावी आहे. त्यामुळे देशात, राज्यात व पर्यायाने जळगाव जिल्ह्यातही अत्यल्प पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील पावसाची तूट यंदा जवळपास २० टक्के आहे. संपूर्ण राज्यात हीच स्थिती असल्याने प्राथमिक टप्प्यात २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यात खानदेशचे सर्व २५ व जळगाव जिल्ह्यातील १५ तालुक्यांचा समावेश आहे. यंदा पाऊसच रुसल्याने हतनूर धरणानेही पाण्याच्या विसर्गात आपला हात आखडता घेतलांय. यंदाच्या मोसमात हतनूर १०० टक्के किंवा त्या जवळपास भरण्याचे केवळ दोन-तीनच प्रसंग आले. धरणाचे ४१ दरवाजे यंदा एकदाही पूर्णक्षमतेने उघडण्यात आलेले नाहीत. आतापर्यंत एक ऑक्टोबरपर्यंत धरणातून २५५९.६० द.ल.घ.मी. (९० टीएमसी) पाणीच सोडण्यात आले आहे. त्यामुळे ‘एल-निनो’चा प्रभाव व त्यामुळे कमी झालेल्या पावसाचा हतनूरच्या विसर्गालाही मोठा फटका बसला असून, त्याचा परिणाम हतनूरच्या खाली असलेल्या शेळगाव, सारंगखेडा, प्रकाशा बॅरेजमधील एकूणच साठ्यालाही बसला आहे. --------- (चौकट) असा आहे हतनूर प्रकल्प धरण : तापी नदीवर तालुका : भुसावळ धरणाचे काम पूर्ण : १९८२मध्ये पाणलोट क्षेत्र : २९४३० चौरस कि.मी. एकूण क्षमता : ३८८ एमसीएम जीवंत साठा क्षमता : २५५ एमसीएम मृतसाठा क्षमता : १३३ एमसीएम आताची स्थिती : १०० टक्के -------- वर्षनिहाय हतनूरमधील विसर्ग वर्ष---------- विसर्ग (टीएमसी) २०१५-१६-----१६४ २०१६-१७-----१९९ २०१७-१८------५६ २०१८-१९-----७६ २०१९-२०-----३४५ २०२०-२१-----१८५ २०२१-२२-----२०४ २०२२-२३-----३५८ २०२३-२४-----२०५ २०२४-२५-----२४९ २०२५-२६----२२७ यंदाच्या मोसमात--९० ------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com