रस्तोरस्ती हॉकर्सचे बस्तान; कारवाईला विरोध अन् मुजोरीही वाढली

रस्तोरस्ती हॉकर्सचे बस्तान; कारवाईला विरोध अन् मुजोरीही वाढली
Published on: 
टुडे ४ मेन फिचर NSK26H33699 जळगाव : महामार्गाच्या पुलाखालील हातगाड्या जप्त करताना अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक. ... NSK26H33698 पथकाच्या कारवाईला विरोध करताना महिला हॉकर्स. ---- शीर्षक रस्तोरस्ती हॉकर्सचे बस्तान; वाढली मुजोरी गुजराल पेट्रोलपंप परिसरात कारवाई; हातगाडी, उड्डाणपुलाखालील टपरी जप्त सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २७ : शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि उड्डाणपुलांखाली हॉकर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यातून वाहतुकीचे प्रश्न अधिक गंभीर होत आहेत. रस्त्याच्या कडेला हॉकर्सने थाटलेले व्यवसायात त्यात अतिक्रमण कारवाईदरम्यान होणारा विरोध यामुळे नागरिकांच्या अडचणीत भर पडत आहे. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी गुजराल पेट्रोलपंप आणि उड्डाणपूल परिसरात कारवाई केली खरी पण कारवाई करताना हॉकर्सचा विरोधामुळे अतिक्रमण निर्मूलन पथकाला नाकीनऊ आले. अखेर हातगाडी व टपरी जप्त करून रस्ता मोकळा करण्यात आला. शहरातील अनेक रस्त्यांवर हातगाड्या, फळविक्रेते आणि टपरीचालकांनी जागा व्यापल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. सुरुवातीला रस्त्याच्या कडेला सुरू होणारे व्यवसाय हळूहळू रस्त्याच्या वापरायोग्य जागेवर पसरतात. त्यातून वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत अतिक्रमणांवर नियमित कारवाई होण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कारवाईला विरोध मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास महापालिकेचे पथक गुजराल पेट्रोलपंप परिसरात पोहोचले. रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या एका महिला केळीविक्रेत्याची हातगाडी जप्त करण्यास सुरुवात करताच तिने कर्मचाऱ्यांना विरोध केला. हातगाडी जप्त होऊ नये, यासाठी तिने पथकाला मज्जाव केल्याने काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अखेर पथकाने हातगाडी ताब्यात घेतली. पुलाखालील टपरी जप्त यानंतर पथकाने गुजराल पेट्रोलपंपासमोरील उड्डाणपुलाखालील अतिक्रमणाकडे मोर्चा वळविला. तेथे अनधिकृतपणे उभारलेली टपरीही जप्त करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली. हॉकर्सच्या संख्येत वाढ शहरातील रस्ते आणि फुटपाथ नागरिकांच्या वापरासाठी मोकळे राहणे आवश्यक असताना, वाढत्या हॉकर्समुळे सार्वजनिक जागांवर अतिक्रमण होत असल्याचे चित्र आहे. प्रमुख मार्गासह अन्य मार्गावर दररोज नवीन हॉकर्स दिसून येत असून शहरात सुमारे सात ते आठ हजार हॉकर्सचा व्यवसाय रस्त्यावर सुरू असून त्या पैकी ४ हजार ३०० यांची नोंदणी महापालिकेकडे आहे. चौकट मनपापुढे नियंत्रण ठेवण्याचे आव्हान महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून कारवाईनंतर पुन्हा त्याच जागी व्यवसाय सुरू होत आहे. ते होऊ नयेत, यासाठी महापालिकेला अतिक्रमण निर्मूलन विभागाची मनुष्यबळ वाढवून प्रभागनिहाय पथकांची नियुक्ती करणे गरजेचे बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com