व्यसनमुक्ती, एड्स व क्षयरोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वणी महाविद्यालयात ‘जागर आरोग्याचा’ उपक्रम

व्यसनमुक्ती, एड्स व क्षयरोगाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन वणी महाविद्यालयात ‘जागर आरोग्याचा’ उपक्रम
Published on: 
फोटो- 13315 वणी ः वणी महाविद्यालयात मुख्यमंत्री ‘आरोग्य संवाद, जागर आरोग्याचा’ या जनजागृतीपर उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. प्रियांक कापडे. वणी महाविद्यालयात जागर आरोग्याचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा वणी, ता. २३ : तरुणांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करून व्यसनमुक्ती, एड्स व क्षयरोगाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने कर्मवीर रावसाहेब थोरात महाविद्यालयात ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद, जागर आरोग्याचा’ हा जनजागृतीपर उपक्रम झाला. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) व विद्यार्थी विकास मंडळातर्फे शुक्रवारी (ता. २३) झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या आरोग्यासह समाजाच्या आरोग्याप्रतिही जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. उपप्राचार्य डॉ. वाय. एम. साळुंके यांनी आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक जबाबदारीचे महत्त्व सांगितले. डॉ. प्रियांक कापडे यांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करावा, तसेच व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मदत मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. वणी ग्रामीण रुग्णालयाचे एड्स क्षयरोग समन्वयक तुषार दुसाने यांनी एड्स व क्षयरोगाविषयी माहिती दिली. या आजारांबाबत समाजातील गैरसमज दूर करून वैज्ञानिक दृष्टिकोनातून आरोग्यविषयक निर्णय घेण्याची गरज त्यांनी स्पष्ट केली. डॉ. एस. बी. लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. वाय. आर. मोहन यांनी आभार मानले. राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. प्रवीण महाले यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी परिश्रम घेतले. प्रा. राजेश गांगुर्डे, प्रा. किरण डेरे आदी उपस्थित होते. ..........

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com