नाशिक- जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता सुरू झाली आहे. आरोग्य विभागामार्फत ३० एप्रिलपर्यंत १३८६ ग्रामपंचायतींच्या सात हजार ३३४ स्त्रोतांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. .पाणी व गुणवत्ता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावर प्रशिक्षण घेण्यात आले. पावसाळ्यापूर्वी एप्रिल, तर त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पाण्याचे स्त्रोत व अन्य बाबींसाठी स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. .जिल्ह्यात एप्रिलमध्ये सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत द्वितीय वैद्यकीय अधिकाऱ्यांवर या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या आधारे ग्रामपंचायतींना लाल, हिरवे, पिवळे, चंदेरी कार्ड वितरित केले जाते. यापूर्वी झालेल्या साथरोग घटनांचा पूर्वानुभव असल्यास व साथीमागील कारणमिमांसा बघितली जाते. सर्वेक्षण गुणवत्तापूर्वक झाल्यास पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या साथींना आळा घालणे शक्य होते..गुणांनुसार वर्गीकरणस्वच्छता सर्वेक्षणात प्राप्त गुणांक्रमांद्वारे तीव्र जोखीम, मध्यम जोखीम व कमी जोखीम, असे स्त्रोतांचे वर्गीकरण करण्यात येते. स्वच्छता सर्वेक्षणातील वर्गीकरणानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येतात. यामध्ये तीव्र जोखीम व मध्यम जोखीम असलेल्या स्त्रोतांबाबत त्वरित उपाययोजना करण्यात येतील..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.