Nashik News : कर्मचाऱ्यांअभावी घाटमाथ्यावरील आरोग्य व्यवस्था सलाइनवर; 12 वर्षांपासून पदे रिक्त

Building of Primary Health Center at Bolthan.
Building of Primary Health Center at Bolthan.esakal

अरुण हिंगमिरे : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नांदगाव तालुक्यातील पूर्व भाग असलेल्या घाटमाथा परिसरातील बोलठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्य सुविधा कर्मचाऱ्या अभावी सलाइनवर आहे. मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त असून आरोग्य केंद्राची संपूर्ण भिस्त ही कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आलेली आहे. (Health system on Ghatmathya on saline due to lack of staff Posts vacant for 12 years Nashik News)

बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत जातेगाव आणि कासारी येथे आरोग्य उपकेंद्र आहेत. तालुक्यात आरोग्याच्या दृष्टीने संवेदनशील म्हणून घाटमाथ्याची ओळख आहे. या आरोग्य केंद्रास एकूण १७ गावे, आणि ९ वाड्या-वस्त्या जोडलेल्या आहे.

या केंद्रावर ३६ हजार ४०० इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. त्यामुळे याठिकाणी आरोग्य केंद्र व उपकेंद्रांना प्रत्यक्ष आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या २९ मंजूर आहे. परंतु १२ ते १३ वर्षांपासून कर्मचारी संख्येला गळती लागली आहे.

सद्य:स्थितीत वैद्यकीय अधिकारी १, सह‌वैद्यकीय अधिकारी १, जातेगाव आणि कासारी येथील आरोग्य उपकेंद्रासाठी समुदाय वैद्यकीय अधिकारी कार्यान्वित आहे. यात सुमदाय अधिकारी यांचे दोन पैकी एक पद रिक्त आहे.

येथे औषधनिर्मिण अधिकारी यांचे एक पद मंजूर असून तेही बारा वर्षापासून रिक्त आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदही अनेक वर्षापासून रिक्त आहे. आरोग्य सहाय्यक पदे दोन त्यापैकी मलेरिया विभाग महाराष्ट्र शासन एक पद मागील १० वर्षांपूर्वी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यापासून रिक्त आहे व दुसरे जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्याकडून असलेले दिगंबर जोशी यांची देखील बदली करण्यात आल्याने आता दोन्ही पदे रिक्त आहे.

आरोग्य सेवक, सेविका यांची सहा पदे मंजूर अजून दोन पदे रिक्त आहे. परिचर यांचे चार पदे असून एक रिक्त आहे. त्यामुळे २९ पैकी केवळ १० कायम कर्मचारी सध्या कार्यरत असून १२ कंत्राटी कर्मचारी आरोग्य विभागाचा डोलारा सांभाळत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Building of Primary Health Center at Bolthan.
Dr. Bharati Pawar : थॅलेसेमियाच्या उपचारासाठी 10 लाखांची मदत मिळणार ; डॉ. भारती पवार

अनफिट दाखवून कर्मचाऱ्याची बदली

प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक दिगंबर जोशी यांना अधिकाऱ्यांनी अनफिट दाखवून त्यांची बदली करत त्यांना कार्यमुक्त करण्यात आलेले आहे. मुळात या केंद्रात आरोग्य सहाय्यक यांचे दोन पदे मंजूर असून एक पद १० वर्षापासून रिक्त आहे.

तर आता जोशी यांच्या बदलीने दोन्ही पदे रिक्त झाली आहे. दुसरा कर्मचारी रुजू न होत श्री. जोशी यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

या संदर्भात आमदार कांदे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सूचना करत नवीन कर्मचारी रुजू होईपर्यंत श्री. जोशी यांना कार्यमुक्त न करण्याच्या सूचना केल्या आहे. मात्र श्री. जोशी यांना कार्यमुक्त केल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा घाटमाथा परिसरात रंगत आहे.

"बोलठाण येथे आवश्यक असलेल्या २९ कर्मचाऱ्यांपैकी सेवानिवृत्त झालेले व बदली होऊन गेलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या लाक्षणिक आहे. या आरोग्य केंद्राचे कार्यक्षेत्र व लोक संख्येचा विचार करता, येथे कमी असलेल्या कर्मचार्ऱ्यांचा आढावा घेऊन पुरेशी कर्मचारी संख्या देण्यात येईल."

- सुहास कांदे, आमदार

"बोलठाण प्राथमिक आरोग्य आरोग्य केंद्रासाठी रिक्त असलेले आरोग्य सहाय्यक आणि आरोग्य सेवक यांची तत्काळ नियुक्ती करणेबाबत आदेश देण्यात येतील."

- डॉ. हर्षल नेहते, जिल्हा वैद्यकीय अधिकारी

Building of Primary Health Center at Bolthan.
Water Shortage Review Meeting : अल निनोच्या पार्श्वभूमीवर सूक्ष्म नियोजन करावे : ZP CEO आशिमा मित्तल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com