नाशिक- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने आरोग्यसेवक (पुरुष) पदाच्या ५० टक्के कोट्यातील १२६ जागांसाठी पात्र उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. मात्र, अंतिम निकाल जाहीर करून नियुक्तिपत्र देण्यासाठी मे उजाडणार आहे..आरोग्य विभागाने औषध फवारणी अधिकारी यांच्यासाठी राखीव ५० टक्के जागांसाठी ५ ऑगस्ट २०२३ ला जाहिरात प्रसिद्ध केली. २४ जुलै २०२४ ला परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीही पूर्ण झाली. या भरती प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली होती. न्यायालयाने निकाल दिल्यावर आता पुढील कार्यवाही सुरू झाली. .हंगामी फवारणी अनुभव धारकांसाठी ११ नोव्हेंबर २०२४ ला आणि सर्वसाधारण गुणवत्ता यादीतील उमेदवारांसाठी २० मार्च २०२५ ला कागदपत्रे तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ग्रामविकास विभागाने १५ ऑक्टोबर २०२४ ला हंगामी फवारणी अनुभवधारकांना प्राधान्य देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. उर्वरित रिक्त जागांवर गुणवत्ता यादीतील पात्र उमेदवारांना नियुक्त करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते..राज्यातील अमरावती, नागपूर, रत्नागिरी, सोलापूर आणि यवतमाळ यांनी अंतिम निवड यादी जाहीर करून उमेदवारांना नियुक्तिपत्रे दिली आहेत. मात्र, नाशिक जिल्हा परिषदेने २० मार्च २०२५ ला कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण करूनही अद्याप अंतिम निवड यादी जाहीर न केल्याने पात्र उमेदवारांमध्ये नाराजी आहे. नियुक्ती कधी होणार, या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची मोठी घालमेल सुरू आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनीही आरोग्य विभागाला पत्र देऊन ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची मागणी केली..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.