कांदेबाग केळी उत्पादनास यंदा फटका

कांदेबाग केळी उत्पादनास यंदा फटका
Published on: 
कांदेबाग केळी उत्पादनास यंदा फटका उष्णता व कमी पावसाने उत्पादकता कमी; शेतकरी चिंतेत सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : खानदेशातील विविध भागात कांदेबाग केळी पिकाची मोठी हानी उष्णता व कमी पावसामुळे झाली आहे. परिणामी, केळीची रास किंवा उत्पादकता कमी झाली असून, सरासरी १२ किलोची रास प्राप्त झाल्याची माहिती आहे. यात नुकसान झाले आहे. कांदेबाग केळी पीक निसवत असताना म्हणजेच जूनमध्ये पाऊस नव्हता. कांदेबाग केळी पक्व होतानादेखील पाऊस कमीच होता. कांदेबाग केळी कमी पाण्यात येणारे पीक म्हणून ओळखले जाते. या पिकास फक्त उन्हाळ्यात पाणी लागते. त्यातही उन्हाळ्यात पिकात निसवण फारशी होत नसते. पावसाळ्यात निसवण होते. कारण त्याची लागवड ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये होते. आगाप लागवड सप्टेंबरमध्ये असते. पण, यंदा पाच महिने अधिक उष्णता होती. कमाल तापमान मे मध्ये सलग चार ते पाच दिवस ४५ अंश सेल्सीअस एवढे काही भागात होते. तर काही भागात किंवा चोपडा, जळगाव, जामनेर भागात कमाल तापमान ४७ अंश सेल्सिअसदेखील एक-दोन दिवस होते. याच कालावधीमधील वादळ व अन्य समस्यांचा फटका या बागांना बसला आहे. त्यात बागांची निसवण अन्य प्रक्रियेला हानी पोचली. खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी खानदेशात कांदेबाग केळीची सुमारे ३२ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. सर्वाधिक लागवड चोपडा तालुक्यात होती. त्यापाठोपाठ जामनेर, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जळगाव, पाचोरा, भडगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा भागात कांदेबाग केळी पीक होते. या सर्वच भागात उत्पादन कमी आहे. कमी दरांचाही फटका बसला आहे. कारण कांदेबाग केळीस सरासरी ११०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. यात अनेकांनी पिकावर एकरी एक लाखांवर खर्च केला. खर्च लक्षात घेता उत्पादन कमी आले आहे. कोट आमच्या भागात वादळात केळीची हानी झाली. कांदेबाग केळी पीक उष्णतेत निसणीच्या अवस्थेत असते. पण, यंदा ऊन जूनपर्यंत अधिक होते. वादळातही हानी झाली. त्यात पिकाची उत्पादकता कमी झाली आहे. - गणेश पाटील, केळी उत्पादक, कठोरा (ता.जि.जळगाव) चौकट वादळात नुकसानीचे सत्र बागांची निसवण व काढणीची प्रक्रिया पावसाळ्यात सुरू होते. परंतु या बागांना यंदा वादळाचा मोठा फटका बसला आहे. एप्रिल ते जून महिन्यात जळगाव, चोपडा, यावल भागात वादळी पाऊस झाला. यात पिकाचे नुकसान झाले. अनेक बागांची पाने फाटली. यामुळे बागांच्या वाढीवर परिणाम झाला. यात फेब्रुवारीतच सरासरी तापमान अधिक होते. मार्च व एप्रिलमध्येही तापमान अधिक होते. पुरेसे पाणी देवूनही कांदेबाग केळी होरपळल्याचे प्रकार जामनेर, जळगाव भागात घडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.