मालेगाव- शहर व परिसरात गेल्या महिन्यापासून उन्हाने कात टाकली आहे. जिवाची काहिली होणारे ऊन पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून तापमानाच्या चढत्या आलेखामुळे भरदुपारी शहर-परिसरातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे दिसून येत आहे. वाढते ऊन, उन्हाच्या झळा व उकाड्यामुळे मालेगावकरांची दिनचर्या बदलली आहे.