Fire Accident : जिंदाल कंपनीला भीषण आग; काही जण जखमी झाल्याची माहिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fire Accident

Fire Accident : जिंदाल कंपनीला भीषण आग; काही जण जखमी झाल्याची माहिती

इगतपुर येथील जिंदाल कंपनीला मोठी आग लागल्याची घटना समोर आली आहे.. आगीचे कारण स्पष्ट झाले नसले तरी काही जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीमध्ये जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आगीच्या स्फोटानंतर आवाज झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी सांगितली आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत काही जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तर आगीत काही जण जखमी झाले होते त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.

हेही वाचा: BJP Strategy : भाजपसाठी 2022 ठरलं सर्वोत्कृष्ट; आता 2023 मध्ये पक्षाला 'या' 10 आव्हानांना सामोरं जावं लागणार!

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. धुराचे लोटच्या लोट हवेत उसळत असल्याने परिसरात काळोखी पसरली आहे. आगीची तीव्रता भीषण असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यास अडचणी निर्माण होत आहेत. दरम्यान, सुरक्षेचा उपाय म्हणून कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर हालवण्यात आले आहे. अधिकचा तपशील अद्याप यायचा आहे.

हेही वाचा: BJP Strategy : भाजपसाठी 2022 ठरलं सर्वोत्कृष्ट; आता 2023 मध्ये पक्षाला 'या' 10 आव्हानांना सामोरं जावं लागणार!

दरम्यान, आगिचे नेमके कारण समजू शकले नाही. सध्या तरी आगीचे कारण शोधण्यापेक्षा आगिवर नियंत्रण कसे मिळवता येईल यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ही घटना घडली आहे.


नाशिक मुंबई महामार्गावर असलेल्या गोंदे गावाजवळ जिंदाल कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये आज बॉयलरचा मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की आजूबाजूच्या 20 ते 25 गावांमध्ये आवाज ऐकू आला. कंपनीत साधारण 2000 कर्मचारी कामाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाच्या घटनेत काही कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अद्यापही सविस्तर माहिती मिळाली नाही.

टॅग्स :NashikFire Accident