esakal | इगतपुरीत धुव्वाधारसह सगळीकडे धुक्याचे साम्राज्य : बघा PHOTO
sakal

बोलून बातमी शोधा

rain

इगतपुरीत धुव्वाधारसह सगळीकडे धुक्याचे साम्राज्य बघा PHOTOS

sakal_logo
By
विजय पगार

इगतपुरी : शहर, तालुका परिसरात सुरू झालेल्या संततधारेमुळे सर्वाधिक वर्दळीच्या मुंबई आग्रा महामार्गावर वाहनचालक धुक्यातून मार्गक्रमण करीत होते.

मंद आणि हलकेच कोसळणाऱ्या पावसामुळे हौशी पर्यटकांना जणू पर्वणीच मिळाली आहे. तालुक्यातील धरणे ओसंडून वाहू लागल्याने निसर्ग पर्यटकांची गर्दी वाढली आहे. पावसाने चौफेर फटकेबाजी करीत वातावरण बदलून टाकले आहे. मध्येच पावसाच्या जोरदार सरी तर मध्येच धुके दाटत असल्याने एका आल्हाददायक वातावरणाची अनुभूती येत आहे. या वातावरणाचा अनुभव आणि धुक्यात मिसळून जाण्यासाठी येथे पर्यटक दाखल होत आहेत पर्यटकांनी त्र्यंबकराजाच्या चरणी लीन झाल्यानंतर तालुक्यातील निसर्ग पर्यटन अनुभवण्यासाठी कूच केली आहे. भावली, भाम, भंडारदरा धरणाकडे गर्दी वाढली आहे. आज दुपारनंतर पावसाचा वेग कमी झाल्याने मनमुराद आनंद घेत पर्यटकांचे लोंढे दिसत होते. याबरोबरच पहिणे बारीतील सौंदर्य बहरल्याने त्र्यंबकला भेट देणाऱ्या पर्यटकांचा ओघ आता पहिणे बारीकडे वाढला आहे.

इगतपुरी : शहर, तालुका परिसरात सुरू झालेल्या संततधारेमुळे सर्वाधिक वर्दळीच्या मुंबई आग्रा महामार्गावर वाहनचालक अशा धुक्यातून मार्गक्रमण करीत होते.

इगतपुरी : शहर, तालुका परिसरात सुरू झालेल्या संततधारेमुळे सर्वाधिक वर्दळीच्या मुंबई आग्रा महामार्गावर वाहनचालक अशा धुक्यातून मार्गक्रमण करीत होते.

संततधार पावसामुळे इगतपुरी भावली, भाम, भंडारदरा धरणाकडे गर्दी वाढली आहे.

संततधार पावसामुळे इगतपुरी भावली, भाम, भंडारदरा धरणाकडे गर्दी वाढली आहे.

त्रिंगलवाडी : संततधारेमुळे परिसरात असे खळाळून पाणी वाहत आहे.

त्रिंगलवाडी : संततधारेमुळे परिसरात असे खळाळून पाणी वाहत आहे.

loading image
go to top