नांदगाव : पुराच्या पाण्याने शहराला वेढले

NANDGAON
NANDGAONESAKAL
Updated on

नांदगाव (जि.नाशिक) : गेल्या दोन दिवसांपासून सुरु सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. काल पासून सुरू असलेला पाऊस आज मध्यरात्रीपर्यंत अखंडपणे सुरू होता. परिणामी लेंडी व शाकांबरी नदी पात्राला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे पुराच्या पाण्याच्या पातळीचा अंदाज आलेला नव्हता. लोहशिंगवे वालूर व मोरझर या क्षेत्रात प्रचंड मुसळधार राशी पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने लेंडी व शाकंबरी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला. दहेगाव नाका गुलजारवाडी भागातील नागरिकांची घरे पाण्याखाली येवून दोन फुटाएवढे पाणी या भागातील घरात घुसले. सुदैवाने अद्यापही नुकसान नाही. तर दुसरीकडे लेंडी नदीच्या पाण्याला वाट मिळाले नाही. परिणामी लेंडी नदीवरील सबवे ते रेल्वे स्थानकापर्यंत भुसावळ मुंबई लोहमार्गावर पाणीच पाणी झाले. रेल्वे स्थानकावर पाणी पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनीमंदीर परिसरातील लेंडी शाखाबंरी नदी पात्र दुथडी भरुन वाहू लागल्याने हायवेवरील वाहतूक बंद पडली. नागरिकांनी मध्यरात्री उशिरापर्यंत नदीपात्रांवर गर्दी केली.शहरातील बाजारपेठेतील मध्यवर्ती भाग आसलेला गांधीचौकात दोन फुट पाणी होते.तर आपत्ती व्यवस्थापन बघणारी शासकीय यंत्रणेतील विविध खातेप्रमुख नेहमीप्रमाणे मुख्यालयात नसल्यामुळे त्यांच्या स्तरावरील उपाययोजना कळायला मार्ग नव्हता

शहरातील लेंडी व शाखाबंरी नदीच्या पुरपाण्याच्या पातळीत सध्या हळूहळू वाढ होत आहे. पन्नास वर्षात नदी सर्वात मोठा पूर असल्याचे सांगण्यात येत आहे. नायडोंगरी बरोबरच परिसरातील शेती क्षेत्रातील पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली आहे.

शहरात नदीपात्रातील अडथळा ठरणाऱ्या टप-या वाहून गेल्या आहेत. मटन मार्केट, भोंगळे रोड दहेगाव नाका मार्केट, कमेटी येथे चिखल...तसेच मध्यवर्ती गांधी चौकातच दोन फुट पाणी. दोघाही नदीने वेढलेय शहराला..हाहाकार माजण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. वीजपुरवठा खंडीत झाल्यामुळे रात्री (ता.७)अंधारात पाण्याची पातळीचा अंदाज बांधता येत नव्हता.

मोरझर लक्ष्मीनगर येथून पाणी नांदगावच्या दिशेने पाणी वाटचाल करत असल्याचे मेसेज स्थानिक, सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. शहरात पावसाची विक्रमी नोंद १३३mm असली तरी तो यापेक्षा जास्त आहे. तालुक्यातही हीच स्थिती असून लहान बंधारे फुटलेत, शेकडो हेक्टर पिकांसह जमीनीचे हानी झाली असून ठिकठिकाणी रस्ते मोरीवरील पुलाचे भराव वाहून गेलेत.

नुकसानीचा आकडा निश्चित व्हायला तीन दिवस लागतील. असे कळत आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक क्षती नांदगाव तालुक्यात झाली असून कोट्यावधींचे नुकसान झाल्याचे समजते. यामुळे पुर्नवसनाचा प्रश्नही गंभीर बनणार असल्याची भिती व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nashik News
NEET Paper Leak Probe Reveals UP-Haryana Link; Question Paper Reached Accused Before Exam
Darade’s Chances Spark Political Buzz as Mahayuti Equations Intensify
Nashik
Marathi News Esakal
www.esakal.com