नाशिक- दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात सोमवारी (ता. १४) ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार सरींचा अनुभव आला. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे जनतेची धावपळ उडाली. पावसाच्या प्रभावामुळे वाकी धरणातून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला असून, वालदेवीच्या विसर्गातही वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील आठ धरणांमधून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे.