Nashik Heavy Rain Damage: जोरदार वारा अन अवकाळी पावसाने पिळकोस येथे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Damaged Poultry & Dead Hens
Damaged Poultry & Dead Hensesakal

Nashik Heavy Rain Damage : पिळकोस ता कळवण सह काल सायंकाळी सहा ते सातच्या सुमारास तासभर झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी बेमोसमी पावसाने व जोरदार वादळी वाऱ्याने पिळकोस येथील तुषार रामचंद्र सूर्यवंशी यांचा ४०० फूट लांबीच्या पोल्ट्री शेडचे पूर्णतः नुकसान झाले असून गाव परिसरात व शिवारात घरांची पत्रे उडून मोठ्या प्रमाणावर पडझड झालेली आहे. (Heavy Rain Damage Strong winds and unseasonal rain caused extensive damage in Pilkos nashik news)

परिसरात काही ठिकाणी फुटाण्यासारख्या आकाराच्या तर काही ठिकाणी चिंचोकीच्या आकाराच्या गारपिटीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या शेतमालाचे देखील नुकसान झाले असून सोसाट्याचा वारा पाऊस व गारपिटीने शेतात झाडे कोलमडून पडली. विजेचे खांब देखीलपडले असल्यामुळे परिसरात रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला होता.

वादळी वारा व पावसाने परिसरातील शेतकऱ्यांची टोमॅटो, मिरची, मोठालीझाडे भुईसपाट झाली झाली,तर नुकतिच लागवड केलेली कोबीचेही नुकसान झाले. आंबासह भाजीपाला पिकांचे या पावसाने अतोनात नुकसान झाले आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे कि काल दि ९ रोजी सायंकाळी सहा ते सात या वेळेत पिळकोस परिसरात अचानक झालेल्या मान्सूनपूर्व अवकाळी बेमोसमी पावसाने व चक्रीय स्वरूपाच्या वादळी वाऱ्याने परिसरातील शेतीचे प्रचंड नुकसान केले असून यात पिळकोस येथील शेतकरी तुषार रामचंद्र सूर्यवंशी यांचा गट नंबर (२५९) मधील ४०० फूट लांबीच्या पोल्ट्री शेडचे सर्व पत्रे उडून त्यातील सर्व साहित्याची मोटतोड होऊन पूर्णतः नुकसान झाले असून ,यातील ९००० पक्षी हि या वादळी पावसाने व गारपीटीने पंधरा दिवसाचे पिल्लं मृत झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Damaged Poultry & Dead Hens
Nashik Rain Damage : देवळा, मालेगावला पावसाची हजेरी; टोकडेत शाळेचे पत्रे उडाले

असूपोल्ट्री त ठेवलेले पक्षीचे १५ टन (फीड )खाद्य गोणी फाटून पावसाने ओले होऊन नुकसान झाले आहे .त्याचप्रमाणे येथील शेतकरी अमोल पगारे ,बारकू आहेर , दिनकर गांगुर्डे ,बारकू गांगुर्डे ,रवींद्र जाधव, उशाबाई जाधव,किरण जाधव,दीपक मोरे यांच्या पक्क्या घरांची पत्रे उडून भिंती पडून मोठ्या प्रमाणावर पडझड होऊन घरांचे नुकसान झाले आहे .

आज सकाळी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच व उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते दादाजी जाधव यांनी गावातील सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व पिळकोस सजाचे तलाठी अविनाश पवार ,ग्रामसेवक नितीन बच्छाव कोतवाल पंकज बच्छाव यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला.

नुकसानीचे वृत्त समजताच तालुक्याचे आमदार नितीन पवार यांनी शेतकरी सूर्यवंशी याना भेटून नुकसानीबाबत विचारपूस केली. तसेच पिळकोसचे तलाठी अविनाश पवार यांनी काल रात्री पिळकोस गावात येऊन रात्री ११ वाजेपर्यन्त नुकसान झालेल्या शेतकऱ्याकडे भेट दिली व नुकसानीची पाहणी केली.

तसेच आज सकाळी मविप्र संचालक रवींद्र देवरे, राष्टवादीचे तालुका अध्यक्ष राजेंद्र भामरे , कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांनी पिळकोस येथे शेतकरी सूर्यवंशी भेट दिली व झालेल्या नुकसानीची पाहणी केली

"वादळी वारा व पावसाने माझ्या ४०० फूट लांबीचा पोल्ट्री शेड हा पूर्णपणे कोलमडून गेला असून पोल्ट्री च्या सर्व साहित्याची मोडतोड झाली आहे. त्यातील ९००० पक्षी मृत झाले व ठेवलेले फीड खाद्य हि पावसाने नुकसान झाले असून या पावसाने माझे प्रचंड नुकसान झाले असून शासनस्थरावरून नुकसान भरपाई मिळावी."

- तुषार सूर्यवंशी ,नुकसान ग्रस्त शेतकरी ,पिळकोस

Damaged Poultry & Dead Hens
Nashik Rain News : निफाड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com