नाशिक- जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाने सर्वदूर समाधानकारक हजेरी लावली असून, पश्चिम भागात रविवारी (ता. ६) मध्यरात्रीपासून सुरू झालेली संततधार दिवसभर व रात्री उशिरापर्यत सुरू होती. पश्चिम पट्ट्यात सर्वाधिक जोर असलेल्या या पावसामुळे गोदावरी, दारणासह प्रमुख नद्यांना पूर आले आहेत. या पावसामुळे दोन जणांचा बुडून मृत्यू झाला असून, सुमारे १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे.