नाशिक- शहरासह उपनगरीय भागांना रविवारी (ता. ११) दुपारी दोनच्या सुमारास अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले. तासभर झालेल्या पावसाने शहरात दाणादाण उडाली होती. वादळी-वाऱ्यासह झालेल्या धुव्वाधार पावसाने शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळल्या. वर्दळीच्या चौकांना तळ्याचे स्वरूप आल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली होती. दिवसभरात ३.४ मिलिमीटर पावसाची नोंद हवामान खात्याने घेतली आहे.