
नाशिक रोडला मुसळधार पाऊस
नाशिक रोड : नाशिक रोड, एकलहरे, शिंदे, पळसे, कोटमगाव, चेहेडी, चाडेगाव, देवळालीगाव, विहीतगाव, जेल रोड आदी परिसरात गुरुवारी (ता. ९) सायंकाळी मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली. हंगामातील या पहिल्याच पावसाने व्यावसायिक आणि नागरिकांची धावपळ उडाली. नाशिकच्या अनेक भागात भूमिगत गटारी आणि गॅस पाइपलाइनसाठी खड्डे (Potholes) खोदून ठेवण्यात आले आहेत. पावसाचे पाणी त्यात साचल्याने नागरिकांचे हाल झाले. (Heavy Rain on Nashik Road Nashik News)
बिटको चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सिन्नर फाटा, देवी चौक, दत्तमंदिर चौक आदी भागात पावसाचे पाणी साचले. दुचाकी व पायी चालणाऱ्या नागरिकांना कसरत करून रस्त्यावरून चालवे लागत होते. तसेच, दुपारी साडेचार ते रात्री सव्वा आठपर्यंत वीज नव्हती, तर रात्री उशिरापर्यंत काही भागात वीज आली. त्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल झाले. दोन- चार दिवसापासून परिसरात भयंकर उकाडा जाणवत होता. सायंकाळी साडेचार- पाचच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले.
हेही वाचा: रेल्वे प्रिमियम पार्किंगवरून वाद; प्रवाशाची थेट पोलिस स्टेशनला तक्रार
तेव्हा पावसाचा अंदाज आला होता. सायंकाळी मुसळधार पावसाला सुरवात झाली. थोड्याच वेळात रस्त्यावरून पावसाच्या पाण्याचे पाट वाहू लागले. वाहनचालक आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून मार्ग काढणे अवघड झाले होते. रात्री उशिरापर्यंत रिमझिम सुरू होती. पाऊस आल्यामुळे रस्त्यावरील भाजी व अन्य व्यावसायिकांनी आपला गाशा लवकर गुंडाळला. पाऊस सुरू झाल्यामुळे नाशिक रोडच्या विविध दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी कमी झाली होती. अचानक आलेल्या पावसामुळे घरी जाणारे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यवसायिकांची तारांबळ उडाली.
हेही वाचा: Nashik : डॉक्टरवर हल्ला करणारे संशयित पोलिसांच्या ताब्यात
एकलहरे केंद्रांतील १३२ केव्ही सबस्टेशनला तांत्रिक बिघाड झाल्याने नाशिक रोडसह काही उपनगरात सायंकाळी साडेचारपासून वीज गेली होती. काही ठिकाणी रात्री सव्वा आठला वीज आली, तर काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत वीज आली. सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने दिलासा मिळाला, परंतु वीज नसल्याने नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागले.
Web Title: Heavy Rain On Nashik Road Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..