पंचवटी- गेल्या चार ते पाच दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. दिवसभर कडक ऊन व अचानक दुपारी तीन ते चारनंतर पडणारा पाऊस, अशी रोजची स्थिती आहे. पंचवटी परिसरात ठिकठिकाणी रस्त्यांवर पाण्याचे तळे साचले असून, बांधकाम विभागाच्या कामकाजाचा फज्जा उडाला आहे. जुना आडगाव नाका, मखलाबाद रोड, दिंडोरी रोड, नाग चौक, पेठ रोड, म्हसरूळ, हिरावाडी रोड आदी ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचून तळ्यांची स्थिती निर्माण झाली आहे.