नाशिक: जिल्ह्यातील पंधरा गावांमध्ये मागील दहा दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. प्राथमिक अंदाजानुसार मका, सोयाबीन व कापसाचे चार हजार २०९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, आठ हजार ४९७ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नुकसानीची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.