
नाशिक : नाशिक जिल्ह्यात झालेला मुसळधार पाऊस, गोदावरी नदीला आलेला पूर, भरलेले दारणा धरण, नांदूर मध्यमेश्वर धरणातून सुरू केलेल्या विससर्गामुळे छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या जायकवाडी धरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील हे पाणी ‘जायकवाडी’त झेपावणार आहे.