Nashik Unseasonal News: मालेगावी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी; कांद्याचे नुकसान

Stagnant water on Old Agra road in Malegaon
Stagnant water on Old Agra road in Malegaonesakal

मालेगाव : शहर व परिसरात अवकाळी पावसाने सायंकाळी जोरदार हजेरी लावली. रात्री नऊ नंतर देखील मुसळधार पाऊस झाला.

जोरदार पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. अनेक भागातील खंडित झालेले वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू झालेला नव्हता. (Stagnant water on Old Agra road in Malegaon)

शहर व ग्रामीण भागात दिवसभरापासून ढगाळ वातावरण होते. सायंकाळी अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची धावपळ उडाली. शहरातील झोपडपट्टी व सखल भागात ठिकठिकाणी पाण्याचे डबके साचले. अवकाळी पावसामुळे ग्रामीण भागात कापूस, मका, कांदा यांचे नुकसान झाले.

शहर व तालुक्यात विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसात जोरदार वारा असल्याने झोपडपट्टीतील अनेक घरांचे पत्रे उडाले. पाऊस सुरु होताच शहरातील सर्व भागातील वीज काही तास गायब होता.

सायंकाळी पावसामुळे कॅम्प, सोमवार बाजार, सटाणा नाका, मोसम पूल, एकात्मता चौक या ठिकाणी फळ विक्रेते, अन्नपदार्थांच्या हातगाड्या लावणाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता.

Stagnant water on Old Agra road in Malegaon
Unseasonal Rains: घरावरील पत्रे उडाले, झाडं पडली ; भोकरदनला अवकाळी पावसाने झोडपले, फळबागांचे नुकसान

त्यामुळे अर्धवट सुरु असलेल्या रस्त्यांवर रात्रीच्या वेळी खड्डे दिसत नसल्याने किरकोळ अपघातही झाले. वाहने ये-जा करताना रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा होत होता.

ग्रामीण भागातही अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची शेतात काढून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी धावपळ उडाली.

सकाळपासून कसमादे परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे सटाणा, दाभाडी, मनमाड, नांदगाव, करंजगव्हाण, येसगाव या परिसरातील शेतकरी तसेच वीटभट्टी चालकांनीही येथे मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कागदाची खरेदी केली.

शेतकरी दहा ते शंभर मीटरपर्यंत प्लॅस्टिकचे कागद खरेदी करीत होते. प्लॅस्टिकमध्ये पिवळा व काळा तसेच जुने बॅनर यांनाही मागणी होती. पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले असले तरी दुष्काळी परिस्थितीत होत असलेला पाऊस फायदेशीर देखील मानला जात आहे.

Stagnant water on Old Agra road in Malegaon
Dhule Unseasonal Rain : अवकाळीने शेतकऱ्यांची दाणादाण; वीज पडून 20 ट्रॅक्टर मक्याचा चारा खाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com