Police escorting the suspect.
Police escorting the suspect.esakal

Nashik Crime News : अनैसर्गिककृत्य केल्याचे सांगू नये म्हणून अपहृत बालकाचा निर्घृण खून!

मनमाड (जि. नाशिक) : अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यावर अनैसर्गिककृत्य केल्यामुळे रडू लागलेल्या मुलाने घरी सांगू नये म्हणून या भीतीपोटी त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचे हेक्सा ब्लेडने उजवा हात कापून निर्घृण खून केल्याची घटना पोलिस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसांनी अत्यंत जलद तपास करत अवघ्या दोन तासांत सोन्या उर्फ राहुल उत्तम पवार (वय १९ वर्ष) या व्यक्तीस अटक केली आहे. तब्बल २२ वर्षांनंतर या प्रकरणामुळे शुभम लोढा हत्याकांडाच्या आठवणी जाग्या झाल्या. (Heinous murder of abducted child in order not to say that committed an unnatural act Nashik Latest Crime News)

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की बुधवारी (ता. ३०) लोकेश सुनील सोनवणे (वय ९, रा. एकलव्यनगर, आठवडेबाजार, मनमाड) हा सायकल खेळण्याचा आनंद घेत होता. मात्र बराच वेळ झाला तरी मुलगा घरी आला नसल्याने आई-वडील आणि त्यांच्या मित्रांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र लोकेश मिळून आला नाही. याबाबत तो हरवल्याची लोकेशची आई सोनी सोनवणे यांनी त्याच दिवशी पोलिसांत फिर्याद दिली. सायंकाळी मुलगा आपल्या घरी नसल्याचे पाहून त्याच्या कुटुंबीयांची रात्र अवघड गेली. दुसऱ्या दिवशी गुरुवारी (ता. १) सकाळी त्याचा शोध सुरू झाला.

दुपारी समजले, की शहरातील फिल्टर हाऊसजवळ एका लहान मुलाला मारून टाकले आहे. मृतदेहाचा शोध घेतला असता, हा बेपत्ता लोकेशच असल्याचे दिसून आले. एक हात करवतीने कापत हाताची करंगळी तोडलेल्या अवस्थेत मृतदेह झाडाझुडपांमध्ये पडला होता. खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शहरभर पसरली. विविध भागातील नागरिक फिल्टर हाऊसजवळ जमा झाले. मुलाचे कुटुंबीय, नातेवाईक आणि त्या भागात राहणारे नागरिकांनी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस, लोहमार्ग पोलिस आणि सुरक्षा बलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.

बालकाची हत्या झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संशयित आरोपीला अटक झाली पाहिजे, अशी आग्रही भूमिका नागरिकांनी घेतली होती. त्यामुळे संशयिताचा शोध घेणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. अशात पोलिसांनी आपल्या तपासाची चक्रे फिरवत सदर भागातील सीसीटीव्ही तपासणीत अपहरण झालेल्या मुलाचे संशयित व्यक्तीसोबतचे फुटेज मिळून आले. डॉग स्कॉड, फिंगर प्रिन्ट व फॉरेन्सिक एक्स्पर्ट यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले.

मिळून आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपहरण झालेला अल्पवयीन मुलगा ज्या व्यक्तीसोबत जाताना दिसत होता त्याचा शोध घेतला. संशयित लोकेशच्या घराजवळ राहत असल्याचे समजल्यावर संशयितास लपून बसलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतले. उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गिते, श्री. सरोवर, सुनील पवार, संदीप वणवे, गणेश नरोटे, मुदस्सर शेख, गौरव गांगुर्डे, रणजित चव्हाण, राजेंद्र खैरनार, संदीप झाल्टे, मुरलीधर बुवा, चंदू मांजरे यांच्या पथकाने प्रयत्न केले.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

Police escorting the suspect.
Nashik News : बिल्डरच्या जाचाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

हृदय पिळून जावे असे केले निहृदयी कृत्य...

पोलिसांनी युवकाकडे चौकशी केली असता, युवकाने त्याच्या लैंगिक भावना जागृत झाल्याने त्याने त्यास रेल्वे बंधारा येथे अंघोळ करण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. बालकावर दोन वेळा अनैसर्गिक कृत्य केले. बालक रडू लागल्याने आणि तो घडलेला प्रकार घरी सांगेन या भीतीने त्याने या अल्पवयीन मुलाच्या डोक्यात दगड घालत त्याचा उजवा हात हेक्सा ब्लेडने कापून त्याचा निर्घृण खून केल्याचे सांगितले.

तब्बल २२ वर्षांनी झाली आठवण...

मनमाड शहरात तब्बल २२ वर्षांपूर्वी घरी कामाला असलेल्या घरगड्याने मालकाचा अल्पवयीन मुलगा शुभम लोढा याचे १२ ऑगस्ट २००० मध्ये अपहरण करून त्याला अंकाई किल्ल्यावर नेत त्याचा दगडाने ठेचून खून केला होता. संबंधित मुलाचा मृतदेह १६ ऑगस्टला मिळाला होता. या घटनेने मनमाड शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली होती. आज लोकेशचे अपहरण करून त्याचाही खून करण्यात आल्याने तब्बल २२ वर्षांनी शुभम लोढा हत्याकांडाची आठवण सर्वांनाच झाली.

Police escorting the suspect.
Nashik News : आराईतील तरुणाचा सटाण्यातील अपघातात मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com