नाशिकमध्ये हेल्मेटसक्ती मोहिमेची आजपासून अंमलबजावणी

नाशिक शहरात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आजपासून हेल्मेट सक्तीचा नियम लागू झाला आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांना प्रशासनातर्फे असहकार मोहीम राबविली जाणार असल्याने आर्थिक दंडाशिवाय तुरुंगात जावे लागण्याचा नियम सुरु झाला आहे.
helmet
helmetesakal
Published on

नाशिक - शहरात पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत आजपासून हेल्मेट सक्तीचा नियम लागू झाला आहे. हेल्मेट न वापरणाऱ्यांना प्रशासनातर्फे असहकार मोहीम राबविली जाणार असल्याने आर्थिक दंडाशिवाय तुरुंगात जावे लागण्याचा नियम सुरु झाला आहे. पेट्रोलपंपावर विना हेल्मेट पेट्रोल वितरण बंद करण्यात आले आहे. पण शनिवार (ता.६) पासून शासकीय कार्यालयात विना हेल्मेट वाहनधारकांना प्रवेश नसणार आहे.

दोन दिवसांच्या सुट्यांमुळे येत्या सोमवारपासून या नियमाचे पडसाद प्रकर्षाने दिसणार आहे. पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी ६ नोव्हेंबरपासून हेल्मेट सक्तीचा नियम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आधी पूर्वकल्पना देऊन त्यानंतर पेट्रोलसाठी नियम केल्यानंतर काही भागात हेल्मेट सक्तीचा नियम गांभीर्याने घेतला जात नसल्याने पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी अधिक सक्तीने या नियमाची अंमलबजावणीचा आदेश लागू केला आहे. त्यानुसार हेल्मेट न वापरणाऱ्यांना असहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार हेल्मेट नसल्यास पोलिसी कारवाया सुरू होणार आहे.

helmet
संत एकनाथांच्या आधुनिक भूमिकेत पोलिस

आज भाऊबीजेपासून सुरू झालेल्या या नियमामुळे शासकीय कार्यालयात विना हेल्मेट प्रवेश नसेल. प्रत्येक शासकीय कार्यालयातील आस्थापना प्रमुखांवर त्यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, सीसीटीव्हीसह पोलिसांकडून त्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. हेल्मेट नसलेल्या नागरिकांचे प्रबोधन करून त्यांना प्रशिक्षण व प्रमाणपत्राचा नियम करण्यात आला. त्यानंतर विना हेल्मेट पेट्रोल देणे बंद करण्यात आले. मात्र त्यावरून काही भागात वाद घातले गेले. पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांशी वादावादी करणाऱ्या विरोधात पोलिसांना मोहीम राबवावी लागली. वाद घालणाऱ्यांना पेट्रोल पंपावर उभे राहून हेल्मेट सक्तीविषयी जनजागृती करण्याचा नियम राबविला गेला. पण उसनवार हेल्मेट घेउन पेट्रोल भरण्याची शक्कल काहींनी शोधल्याने अशा चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com