Positive News : व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक मदत; सामाजिक बांधिलकीची कृतिशीलता समाजासमोर

Social activist Nimba Marathe giving a check to the family of  Kalamkar who died due to electric shock
Social activist Nimba Marathe giving a check to the family of Kalamkar who died due to electric shockesakal

Nashik News : सोशलमीडिया बद्दल सातत्याने नकारात्मक बोलले जाते. मात्र अलीकडच्या काळात मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम 'व्हॉट्सॲप' ग्रुपच्या माध्यमातून झाले आहे. (Help of 1 lakh rupees to Kalamkar family through Whatsapp group nashik news)

खडकी (ता.मालेगाव) येथील शेतकरी बापलेकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. घरातील दोन्हीकर्ते पुरुष गेल्याने संसार कोलमडून पडला. अशा परिस्थिती कळमकर कुटुंबीय यांना एक लाख एक हजार रुपयांची मदत 'व्हॉट्सॲप' समूह माध्यमातून देत सामाजिक बांधिलकीची कृतिशीलता समाजासमोर ठेवली.

खडकी येथील पंढरीनाथ पांडुरंग कळमकर आणि त्यांचा एकुलता एक मुलगा समाधान (वय २८) या दोन्ही बापलेकांचा विजेच्या तारेचा स्पर्श होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने सासू आणि सुनेला एकाच वेळी वैधव्य आले.

मृत समाधान यास साडेतीन वर्षांचा मुलगा व पाच वर्षांची मुलगी आहे. समाधानच्या मोठ्या भावाचा सात वर्षांपूर्वी धरणात बुडून मृत्यू झालेला आहे. घरात कमविता असे कोणीच नसल्याने धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते निंबा मराठे यांच्या 'सामाजिक व्हॉट्सॲप समुहाच्या माध्यमातून अनेकांनी एकत्र येत अवघ्या काही दिवसांत लाख रुपये उभे केले.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Social activist Nimba Marathe giving a check to the family of  Kalamkar who died due to electric shock
Positive News : रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; रिक्षात राहिलेला बाजार केला घरपोच

सामाजिक भान जोपासत या मदतनिधी संकलनाचा निर्णय समूहात घेण्यात आला. यामध्ये गणेश पवार (धुळे), प्रशांत गायकवाड (चाळीसगाव), लक्ष्मण कदम (शहादा), मनोज पवार (सूरत), सदाशिव चव्हाण (नाशिक) यांनी 'ग्रुपवर ऑनलाइन मदत पाठविण्याचे आवाहन केले. समुहातील मित्रपरिवाराने सकारात्मक प्रतिसाद देत अवघ्या सात दिवसात १ लाख १ हजार रुपयांचा मदतनिधी संकलित झाला. खडकी येथे स्व.कळमकर कुटुंबीयांचे सांत्वन करत मदतीचा धनादेश दिला.

यावेळी श्री. मराठे यांचेसह माजी नगरसेवक संदीप पाटोळे, केशव पाटील, गणेश पवार, प्रशांत गायकवाड, देविदास पवार, सदाशिव चव्हाण, प्रकाश शेलार, बाळासाहेब गवारे, कौतिकराव थोरकर, रघुनाथ मराठे , प्रकाश ठुबे, साहेबराव शेळके आदींसह गावातील सजन कळमकर, मुरलीधर कळमकर, काशिनाथ कळमकर, अण्णाजी बागूल, अशोक देवरे, डॉ. अजय कळमकर, शरद जाधव, प्रकाश ठुबे, लक्ष्मण ठुबे, नाना ठुबे, विकास कळमकर, पितांबर कळमकर, समाधान मोरे, कारभारी कळमकर, भगवान कळमकर, जिभाऊ मलिक उपस्थित होते.

खासदार डॉ. भामरे यांच्यातर्फे ३१ हजारांची मदत

विजेच्या धक्क्याने बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने डॉ.भामरे यांनी खडकी येथे जाऊन स्व.कळमकर कुटुंबीयांचे सांत्वन करत व्यक्तिगत ३१ हजार रुपयांची आर्थिक मदत देत शासकीय पातळीवरून निश्चितपणे आर्थिक मदत मिळवून देऊ असे सांगितले

Social activist Nimba Marathe giving a check to the family of  Kalamkar who died due to electric shock
Dada bhuse : दोन दिवसात पंचनामे पूर्ण करा : दादा भुसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com