esakal | सोशल मिडियातून तरुणाईचा मदतीचा हात!प्लाझ्मासह अन्‍य माहिती केली जातेय अपडेट

बोलून बातमी शोधा

social media
सोशल मिडियातून तरुणाईचा मदतीचा हात!प्लाझ्मासह अन्‍य माहिती केली जातेय अपडेट
sakal_logo
By
अरूण मलानी

नाशिक : सध्या तरुणाई दिवसभरातील सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालवते. परंतु या माध्यमाचा सकारात्‍मक वापर शहरातील तरुणाईकडून केला जात आहे. इन्‍स्‍टाग्रामद्वारे तरुणाई कोरोनाबाधित रुग्‍ण व त्‍यांच्‍या नातेवाइकांना मदतीचा हात दिला जातो आहे.

इन्‍स्‍टाग्रामद्वारे तरुणाईचा गरजूंना मदतीचा हात

रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, औषध यापैकी कुठलीच गोष्ट सहजासहजी मिळत नसल्‍याची सद्यःस्‍थिती आहे. या समस्‍येचे निदान शोधताना युवक-युवती रुग्णालयात बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर मिळवून देण्यासाठी धडपड करत आहेत. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. संजना बिरारी, अपूर्वा खरे आणि राहुल राज या तिघांनी उपक्रमांसाठी पुढाकार घेतला आहे. तिघांनी मिळून सुरवातीला आपले संपर्क वापरून रुग्णांना मदत मिळवून देण्यास सुरवात केली. सध्या सुमारे वीस लोकांची टीम ऑनलाइन माध्यमातून गरजूंपर्यंत मदत पोचवित आहे. ईशा देव, अपूर्वा खरे, रुद्र मजिठिया, रितू बागूल, कृष्णा बोडके, आदीश्री घोडके, हर्षिता त्रिवेदी, कृष्ण वडोदरिया, प्रणव सोनवणे यांसह अनेक युवक जोडले गेले आहेत. मदतीसाठी इन्स्टाग्रामवर हॅन्डल्स तयार केले आहेत. त्यावर येणाऱ्या मदतीसाठीच्या मेसेजेसना हे तरुण कृतीतून प्रतिसाद देत आहेत. आत्तापर्यंत ३७ प्लाझ्मा, ३६ ऑक्सिजन सिलिंडर, ४६ ऑक्सिजन बेड्स, पाच व्हेंटिलेटर बेड, ३९ इंजेक्शन्स मिळवून देण्यात यश आल्‍याचा दावा या तरुणांनी केला आहे.

हेही वाचा: लस दोनदा घेतली... मी जिवंत आहे बघा!

प्‍लाझ्मासह अन्‍य माहिती केली जातेय अपडेट

असे आहेत इन्‍स्‍टाग्रामवरील हॅन्डल्स

@nashikfightscovid

@awwfool

@swaad_of_nashik

@fanished.always_

@thefooddelights

@__thefreesoul__००८