Mahaswayam Helpline: महास्वयंम वेबपार्टलवर तक्रार नोंदविण्याठी हेल्पलाइन सुरू!

Mahaswayam
Mahaswayam esakal

Mahaswayam Helpline : कौशल्य रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागामार्फत महास्वयंम पोर्टलवर ऑनलाइन सुविधा घेताना लाभार्थी घटकांना येणाऱ्या अडचणी, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन सुरू करण्यात असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिली. (Helpline for registering complaints on Mahaswayam webpartal started nashik)

Mahaswayam
Nashik News: हातगाड्यांवर शहरात रात्री अकरानंतर सक्तीची कारवाई थांबवावी; अपर पोलिस अधिक्षकांना निवेदन

उमेदवार, उद्योजक, नियोक्ते यांना नोंदणी करणे, नोंदणीचे अद्ययावतीकरण, रिक्त पदे अधिसूचिती, रिक्त पदास अनुसरून अप्लाय करणे, राज्यातील युवक व विद्यार्थी यांना करिअर विषयक संधीची माहिती, रोजगार मेळावे व रोजगार प्रोत्साहन कार्यक्रमात इच्छुकता दर्शविणे, विविध प्रशिक्षण संस्था, स्टार्टअप इत्यादी विविध ऑनलाइन सेवा-सुविधा महास्वयंम पोर्टलवरून देण्यात येतात.

सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनची वेळ सकाळी आठ ते रात्री आठ असून हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १८००१२०८०४० वर अडचणी व तक्रारीची नोंद करता येणार आहे.

Mahaswayam
Nashik Damage Road: संततधार पावसाने रस्त्यांवर खड्ड्‌यांचे साम्राज्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com