नाशिक- नाशिककर खासदाराला एकदाच संधी देतात, हा दावा मोडून काढत सलग दोनदा लोकसभेवर निवडून आलेले माजी खासदार हेमंत गोडसे काही नगरसेवकांसोबत भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा दोन दिवसांपासून शहरात सुरु आहे. परंतु, आपण भाजपमध्ये जाण्याचा अद्याप कुठलाही विचार केला नसल्याचे स्पष्टीकरण देताना शिवसेनेत पक्ष शिस्त नसल्याची टीका केल्याने गोडसेंचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.