Speaking at the Nasaka Farmers' Gathering, Khat. Hemant Godse.
Speaking at the Nasaka Farmers' Gathering, Khat. Hemant Godse.esakal

Hemant Godse | साखर कारखानदारीला केंद्राच्या धोरणाने चांगले दिवस : खासदार गोडसे

नाशिक : शाश्वत भाव असलेले देशातील ऊस हे एकमेव पीक असून केंद्र शासनाने साखरे बरोबरच उपपदार्थ निमिर्तीला चालना देताना इथेनॉल वापर इंधनामध्ये २० टक्के करण्याचा घेतलेला निर्णय क्रांतिकारक आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस पिकाला प्राधान्य देताना जास्तीत जास्त टनेज देणाऱ्या उसाची लागवड करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन नाशिक साखर कारखान्याचे अध्यक्ष खासदार हेमंत गोडसे यांनी केले.

नाशिक सहकारी साखर कारखाना संचलित दीपक बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्सतर्फे झालेल्या शेतकरी मेळाव्याच्या व्यासपीठावर संचालक शेरझाद बाबा पटेल, सागर गोडसे, निफाडचे संचालक बी. टी. कडलग, व्यवस्थापक बी. एन. पवार, एस. जे. इंगवले आदी उपस्थितीत होते. (Hemant Godse statement at Nashik Cooperative Sugar Factory meet nashik news)

पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे डॉ. भरत रासकर म्हणाले गेल्या ९० वर्षात ऊस संशोधन केंद्रामार्फत उसाचे १६ वाण विकसित करण्यात आलेले आहे. त्यात वेळोवेळी आधुनिकतेला वाव दिलेला आहे.

देशातील ७२ टक्के क्षेत्रात झालेली ऊस लागवड ही पाडेगाव संशोधन केंद्राने विकसित केलेल्या ऊस जातीची आहे. डॉ. अरुण देशमुख यांनी ठिबक सिंचनाद्वारे पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना अतिरिक्त पाण्याचा होणारा ऱ्हास व नापिक होणारी जमीन यासाठी ठिबक सिंचनाला महत्त्व देण्याचे सांगितले.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Speaking at the Nasaka Farmers' Gathering, Khat. Hemant Godse.
Nashik News : चिंचखेडला 3 बिबट्यांच्या बछड्यांचे दर्शन; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

डॉ. किरण ओंबासे यांनी खोडवा ऊस उत्पादन वाढीचे सुधारित तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन केले. तर डॉ. मंगेश बडगुजर यांनी उसावरील रोग व कीड नियंत्रण याबाबत सखोल मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. प्रस्ताविक कार्यालयीन अधीक्षक सुधाकर गोडसे, सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर, तर आभार ऊस विकास अधिकारी अरुण पाटील यांनी मानले.

माजी अध्यक्ष तानाजी गायधनी, विलास आडके, कैलास टिळे, बाबूराव मोजाड, नारायण मुठाळ, लकी ढोकणे, सुकदेव आडके, रामचंद्र टिळे, नामदेव गायधनी, अशोक हारक, नामदेव बोराडे, शंकर रोकडे, मोतीराम जाधव, बाळासाहेब पानसरे, भास्कर गायधनी आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते.

Speaking at the Nasaka Farmers' Gathering, Khat. Hemant Godse.
Eat Right India : श्री अन्नपूर्णा प्रसादालयास भोग प्रमाणपत्र प्रदान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com