सी.गो.पाटील महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन

सी.गो.पाटील महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्घाटन
Published on: 
MSI26B09750 साक्री (जि. धुळे) : सी. गो. पाटील महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्‌घाटन करताना डॉ. राजेंद्र अहिरे. -------------------- प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण द्यावे डॉ. राजेंद्र अहिरे : पाटील महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीचे उद्‌घाटन सकाळ वृत्तसेवा म्हसदी, ता. २५ : शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ पदवी प्रदान करणे नसून विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, नैतिक मूल्ये आणि सामाजिक जाणीव निर्माण करणे हे आहे. प्राध्यापकांनी माहितीचे ज्ञानात आणि ज्ञानाचे विवेकात रूपांतर करून विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण द्यावे, अशी अपेक्षा माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र अहिरे यांनी केले. विद्या विकास मंडळाच्या सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक प्रबोधिनीच्या उद्‌घाटनप्रसंगी ‘उच्च शिक्षणाची दशा आणि दिशा : महाराष्ट्राच्या संदर्भात’ या विषयावर ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. प्राचार्य डॉ. अनंत पाटील अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य प्रा. डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, प्राध्यापक प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा. डॉ. सचिन गोवर्धने उपस्थित होते. डॉ. अहिरे यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक परंपरेचा आढावा घेताना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक योगदानाचा उल्लेख केला. उच्च शिक्षणाचा विकास केवळ महाविद्यालयांची संख्या वाढवून होणार नाही, तर शिक्षणाची गुणवत्ता, संशोधनाच्या संधी आणि ग्रामीण, आदिवासी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना समान संधी उपलब्ध करून देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य डॉ. अनंत पाटील यांनी शिक्षणासोबत नैतिक मूल्ये, शिस्त आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे महत्त्व विशद केले. या वेळी शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रीतम तोरवणे यांनी प्रास्ताविक केले. धनंजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. सुरेंद्रसिंग मगर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com