नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर घोटी-पहिने-जव्हार सीमेपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णंय घेण्यात आला आहे. नाशिक रोड येथे रेल्वेच्या १२ एकर जागेवर मल्टीमॉडेल हब प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी रेल्वेने पर्यायी जागेची मागणी केल्याने महसुल प्रशासनाकडून जागेचा शोध घेण्यास सुरवात झाली आहे.