CET Exam : सीईटी परीक्षेच्या शुल्कामध्ये पुन्हा वाढ; विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सामायिक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) शुल्कामध्ये दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
CET Exam
CET Examesakal

CET Exam : सरळसेवा भरतीच्या शुल्क वाढीवरून राज्यातील स्पर्धा परीक्षार्थी आधीच संतापलेले असताना आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) सामायिक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) शुल्कामध्ये दोनशे रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. (hike in CET exam fees has sparked intense resentment among students nashik news)

दरम्यान, या प्रवेश परीक्षांच्या नोंदणीसाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली. राज्यात सुरू असलेल्या सरळसेवा भरतीसाठी एक हजार रुपये शुल्क वसूल केले जात आहे. यामुळे परीक्षार्थींमध्ये आधीच नाराजी आहे. सरकार खासगी कंपन्यांच्या नफ्यासाठी शुल्कवाढ करत असल्याचा आरोप विद्यार्थी करत आहे. आता पुन्हा सीईटीच्या परीक्षा शुल्कामध्येही वाढ करण्यात आली आहे

समूहासाठी मोजा सोळाशे रुपये

गेल्या वर्षी सीईटी सेलतर्फे खुल्या प्रवर्गासाठी आणि महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांसाठी ८०० रुपये, तर सर्व राखीव प्रवर्गासाठी ६०० रुपये शुल्क होते. यंदा खुल्या प्रवर्गासाठी एक हजार, तर सर्व राखीव प्रवर्गासाठी ८०० रुपये शुल्क आहे.

CET Exam
CET Exam : सीईटीचे संभाव्य वेळापत्रक घोषित

पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) आणि ‘पीसीबी’कडून (फिजिक्स केमिस्ट्री, बायोलॉजी) यापूर्वी एकत्र अर्ज करताना एक हजार रुपये घेतले जात होते. आता या दोन समूहासाठी अर्ज करताना सोळाशे रुपये मोजावे लागत आहेत.

''विद्यार्थी म्हणजे शासनाचे तिजोरी भरण्याचे साधन नाही. त्यामुळे सरकारने शुल्क वाढविण्यापेक्षा विद्यार्थ्यांना अधिक सवलती कशा देता येतील, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सीईटी परीक्षेसाठी शुल्कवाढ केल्याने सामान्यांना मोठा फटका बसणार आहे.''- डॉ. संजय शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघ

CET Exam
CET Exam : ‘सेट’साठी करा आजच अर्ज; ऑनलाइन प्रक्रिया सुरू; ३१ जानेवारीची अंतिम मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com